बेलोरा येथे ‘तहसील आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST2021-07-11T04:11:05+5:302021-07-11T04:11:05+5:30
दर्यापूर : महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियान अंतर्गत ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम बेलोरा येथे राबविण्यात आला. तहसील कार्यालयामध्ये ग्रामस्थांची ...

बेलोरा येथे ‘तहसील आपल्या दारी’
दर्यापूर : महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियान अंतर्गत ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम बेलोरा येथे राबविण्यात आला. तहसील कार्यालयामध्ये ग्रामस्थांची रेंगाळलेली कामे व विविध योजना याविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात मंडल अधिकारी जयस्वाल व तलाठी वानखडे यांनी या उपक्रमाचे आयोजन बेलोरा येथे केले. सरपंच अनिल भारसाकळे, उपसरपंच मधुकर चारथळ, सचिव संजय धोटे, मनोहरराव भारसाकळे, राजू भारसाकळे, प्रवीण राणे, संजय भारसाकळे, प्रफुल भारसाकळे, गौरव भारसाकळे, शंकर झाडगे, साहेबराव तराळ, नाजूकराव नारोळकर, दादू चव्हाण,गजानन भारसाकळे, दहीहांडेकर, मिसाळ, कोतवाल अमित भारसाकळे, कर्मचारी विनोद तराळ व गावकरी याप्रसंगी उपस्थित होते.
100721\1827-img-20210710-wa0030.jpg
महाराजस्व अभियानांतर्गत तहसील आपल्या दारी या उपक्रमाचे बेलोरा येथे आयोजन...