अचलपूर : तहसील कार्यालय अंतर्गत तहसील आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येत असून, याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जाग्यावरच करण्यात येत आहे. तीन महिन्यापासून अचलपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाला प्राप्त झालेल्या ब दर्जाचा निपटारा करणे पूर्ण कालावधी शक्य झाले नाही. त्यामुळे अचलपूर तहसील कार्यालयाने प्रत्येक गावात कामे करण्याचा शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत करीत आहे. याचा फायदा तालुक्यातील शेतकरी, निराधार, वृद्ध, शेती संबंधित रस्त्याच्या तक्रारी, शेती विषयक तक्रारींचा निपटारा करण्याकरिता होत आहे. आतापर्यंत देवगाव कविता आम्हाला या गावात हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. अचलपूर, रासेगाव, परतवाडा मंडळातील शेतकऱ्यांच्या बांधावर अनेक रस्त्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. या उपक्रमाचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
भोपापूर, थूगाव, पोही शिंदे येथील शेतकऱ्यांचा रस्त्यांचा प्रश्न निघाली निघाला. ७९ संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांची प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यात देवगावातील १५, कविठा गावात २६, खरबीतील २६ प्रकरणांचा समावेश आहे. ६५ लाभार्थींची मयत झाले. याचा शोध या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला.
या गावात अचलपूर तहसील पुरवठा विभागातर्फे नागरिकांच्या नवीन नावे रेशन कार्ड समाविष्ट करणे त्यांना आरसी क्रमांक देणे तसेच नाव कमी करणे त्याचप्रमाणे इतर धान्य वितरण संबंधित नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्यात आली.
कोट
शासन आपल्या दारी हा उपक्रम दोन महिने चालणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन हजारो नागरिकांच्या तक्रारी या अंतर्गत निकाली काढण्यात येणार आहे.
- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर