अमरावती जिल्ह्यात शिक्षक दिनी शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:03 IST2018-09-11T10:57:56+5:302018-09-11T11:03:44+5:30

शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भातकुली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक दिनीच एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासले.

A teacher molested student in Amravati district on teachers day | अमरावती जिल्ह्यात शिक्षक दिनी शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अमरावती जिल्ह्यात शिक्षक दिनी शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

ठळक मुद्देघडला प्रकार लपविण्यासाठी दमदाटीही केली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भातकुली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. सुरेश ठाकूर (५०,रा.रविनगर, अमरावती) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक दिनीच एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासले.पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सदर विद्यार्थिनीसह अन्य मुलींना सुरेश ठाकूर याने शिक्षक दिन कार्यक्रम आयोजनासंदर्भात घरी बोलावले. त्यावेळी पीडित विद्यार्थिनीचा हात पकडून तिला पलगांवर बसविले. शिक्षक दिनात भाग घेत नसल्याच्या कारणावरून तिला दमदाटी केली. हा प्रकार अन्य विद्यार्थिंनाही वेगळा वाटला. यापूर्वीही ठाकूरने विनयभंग केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार घरी सांगायचा नाही, अशी धमकीसुद्धा तिला दिली. हा प्रकार तिने तिच्या आजी सांगितला. शिक्षकाच्या या कृत्याची तक्रार पीडितेने सोमवारी भातकुली पोलीस ठाण्यात नोंदविली असून, पोलिसांनी आरोपी सुरेश ठाकूरविरुद्ध भादंविच्या कलम ३५४(अ), १२ पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: A teacher molested student in Amravati district on teachers day