दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 20:53 IST2019-10-06T20:53:04+5:302019-10-06T20:53:07+5:30
परतवाडा मार्गावरील मडकी गावानजीक रविवारी सायंकाळी ७ वाजता दुचाकीचा अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू
चिखलदरा (अमरावती) : परतवाडा मार्गावरील मडकी गावानजीक रविवारी सायंकाळी ७ वाजता दुचाकीचा अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. सुनील पांडुरंग अवघड असे मृताचे नाव आहे. भातकुली तालुक्यातील गणोरी या गावाचे रहिवासी सुनील अवघड हे चांदूर बाजार तालुक्यातील बोराळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक होते, अशी माहिती त्यांचे बंधू तथा सावळी दातुराचे ग्रामसचिव बी.पी. अवघड यांनी दिली.
त्यांच्या एमएच २७ सीजी ०३२२ या क्रमांकाच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. रक्तबंबाळ अवस्थेत ते मडकी जवळ रस्त्याच्या कडेला पडून होते. अचलपूर तालुक्यातील आदर्श देवगावचे सरपंच गजानन येवले यांना दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सदर शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे यांनी दिली.