शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

तूर खरेदी केंद्रांना ३१ पर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: May 9, 2017 00:10 IST

जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी केली.

शेतकऱ्यांना दिलासा : चार लाख क्विंटल तूर घरी पडूनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी केली. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे किमान ४ लाख क्विंटल तूर घरी पडून आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र याविषयीचे शासनादेश अद्याप प्राप्त नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले. जिल्ह्यातील १० शासकीय तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलनंतर १४ हजार २१ शेतकऱ्यांची २ लाख ७२ हजार १७० क्विंटल तूर पडून होती. यापैकी पाच हजार ४७१ शेतकऱ्यांची एक लाख १३ हजार ९५७ क्विंटल तूर राज्य शासनाद्वारा खरेदी करण्यात आली. अद्याप आठ हजार ५५० शेतकऱ्यांची एक लाख ५८ हजार ३२८ क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे. जिल्ह्यातील १० तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलनंतर या केंद्रावर पाच हजार ४७१ शेतकऱ्यांची एक लाख १३ हजार ९५७ क्विंटल तुरीची खरेदी राज्य शासनाद्वारा करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे केंद्रावर १५८ शेतकऱ्यांची दोन हजार ३३१ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर ३२० शेतकऱ्यांची सहा हजार १७२ क्विंटल, मोर्शी केंद्रांवर ३२३ कर्मचाऱ्यांची पाच हजार ९८७ क्विंटल, अमरावती केंद्रावर ५५० शेतकऱ्यांची १७ हजार ९९ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ४७४ शेतकऱ्यांची सात हजार ६९० क्विंटल, अचलपूर केंद्रावर ९३४ शेतकऱ्यांची १९ हजार १७५ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावर ७३९ शेतकऱ्यांची १३ हजार ४६४ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर ६२२ शेतकऱ्यांची १३ हजार ११२ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर ७५८ शेतकऱ्यांची १८ हजार ९७२ क्विंटल, वरूड केंद्रावर ५३६ शेतकऱ्यांची नऊ हजार ३३४ क्विंटल व आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी केंद्रावर ५७ शेतकऱ्यांची ६१५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. महिनाभरापूर्वीचे चुकारे अद्याप झालेले नाही. दर्यापूर, अचलपूर, अमरावती केंद्रावर सर्वाधिक तूर पडूनसद्यस्थितीत दर्यापूर केंद्रावर २८६३ शेतकऱ्यांची ३०७२३.१२ क्विंटल, अमरावती केंद्रावर २०७० शेतकऱ्यांची २८९०१.१६ क्विंटल, अचलपूर केंद्रावर १४४५ शेतकऱ्यांची २८,१५१ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर ९८८ शेतकऱ्यांची ६७२२ क्विंटल, वरूड केंद्रावर ४४६ शेतकऱ्यांची २३,७५७ क्विंटल, चांदूररेल्वे केंद्रावर १७ शेतकऱ्यांची ७३० क्विंटल, नांदगाव केंद्रावर २२ शेतकऱ्यांची २३२७ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ४२ शेतकऱ्यांची १३,५५९.२२ क्विंटल, अंजनगाव सुर्जी केंद्रावर ३८७ शेतकऱ्यांची ८२३८ क्विंटल व धारणी केंद्रावर ११७ शेतकऱ्यांची २५०० क्विंटल तूर खरेदी व मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.वादळासह पावसाची शक्यता, ताडपत्र्यांची कमतरताहवामान विभागाने विदर्भात तुरळक ठिकाणी वादळासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. बहुतांश बाजार समित्यांच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांची तूर मात्र उघड्यावर आहे. पाऊस आल्यास व तूर ओली झाल्यास शासकीय खरेदी रखडणार आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्याजवळील प्लास्टिक कागद व ताडपत्रीने तूर झाकत आहे. बाजार समित्यांनीही ताडपत्री पुरविणे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे. व्हीसीएमएफकडे २९ हजार बारदाना उपलब्धजिल्ह्यातील तूर खरेदी यंत्रणा असणाऱ्या डिएमओकडे बारदाना पुरेसा उपलब्ध आहे. व्हीसीएमएफकडे मात्र कमतरता होती. आता या यंत्रणेकडेही २९ हजार बारदाना उपलब्ध आहे. यामध्ये अमरावती केंद्रावर १० हजार, धामणगाव रेल्वे केंद्रावर तीन हजार, चांदूररेल्वे केंद्रावर २ हजार ५००, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर दोन हजार व मोर्शी केंद्रावर ११ हजार ५०० बारदाना उपलब्ध आहे.