कोरोना लसीकरण अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:30+5:302020-12-13T04:29:30+5:30

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लस उपलब्ध होणार असून लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला ...

Task Force for Corona Vaccination Implementation | कोरोना लसीकरण अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

कोरोना लसीकरण अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लस उपलब्ध होणार असून लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. लसीकरणासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ आदी यंत्रणा उभारण्याचे निर्देश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी डीप फ्रिजर, आईसलाईन रेफ्रिजेरेटर, शीत साखळी केंद्रे, व्हॅक्सीन कॅरिअर, कोल्ड बॉक्स पॅक आदी साधनसामग्री सज्ज ठेवावी तसेच आरोग्य यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कुशल मनुष्यबळ नेमून पथके तयार करावीत. कोरोना प्रतिबंधक दोन लसींचा डोज आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करला लस टोचली जाणार आहे. शासकीय, निमशासकीय आरोग्य यंत्रणा, खाजगी आरोग्य यंत्रणेकडील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यानुसार लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्चित करावी. लसीकरण पथके तयार करावीत व त्यांना प्रशिक्षण द्यावेत आदी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात सामान्य नागरीकांना लस टोचली जाणार आहे. त्यासाठी वेबसाईट व ॲपवर लसीकरणासाठी नावनोंदणी करण्यात येणार आहे. नाव, पत्ता, आधार कार्ड अपलोड केल्यानंतर मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे. लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण कळविले जाणार आहे.

बॉक्स

या ठिकाणी लसीकरण केंद्र

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १४ ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये, एक वैद्यकीय महाविद्यालय, १३ नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात येतील. जिल्ह्यात ४ हजार ४८१ व्हॅक्सीन कॅरिअर, १३४ डीप फ्रिजर, १३३ आईसलाईन रेफ्रिजेरेटर, २५५ कोल्ड बॉक्स आदी साधने सज्ज ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

लसीकरणाचे टप्पे

पहिल्या टप्यात हेल्थ केअर वर्कर (शासकीय आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स), दुसऱ्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर (गृह, महसूल, होमगार्ड संबंधित अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी),तिसऱ्या टप्यात हायरिस्क ५० वर्षावरील व्यक्ती व चौथ्या टप्यात उर्वरित सर्व नागरिकांना लसिकरण केल्या जाणार आहे.

Web Title: Task Force for Corona Vaccination Implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.