शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी भेट राहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 8:15 PM

जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे  जैनधर्मीयांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याबद्दल येथील जैन बांधवांसह संस्थानच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.

ठळक मुद्देनागपूरच्या चतुर्मासात पोहोचायला झाला असता विलंब जैनांची काशी आहे मुक्तागिरी

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे  जैनधर्मीयांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याबद्दल येथील जैन बांधवांसह संस्थानच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.‘जैन धर्मीयांची काशी’ म्हणून ओळख असलेल्या मुक्तागिरी येथे सर्व जैन मुनी संत भेट देतात. देश-विदेशातून येथे मोठ्या प्रमाणात जैन बांधव वर्षभर दर्शनासाठी येतात. प्रत्येक आठवड्यातील रविवार वगळता प्रवेश सुरू राहतो. येथे पुरातन ५२ मंदिरे आहेत.पाच वर्षांपूर्वी आला होता योगजैन मुनी तरुण सागरजी महाराज मुक्तागिरी येथे यावेत, यासाठी संस्थानचे ट्रस्टी अशोक चवरे यांनी कारंजा येथील त्यांच्या निवासस्थानी जैन मुनी आले असता, इच्छा प्रकट केली होती. त्यावर वेळेचा अवधी पाहता, नागपूर येथील चतुर्मास कार्यक्रमानिमित्त हे शक्य नसल्याने तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी येथील भेट हुकली. बंगळुरू येथून पुणे, अकलूज, पंढरपूर, औरंगाबाद, कारंजामार्गे नागपूरला जात असताना अशोक चवरे यांच्या घरी मुनी तरुण सागरजी यांनी विहार केला होता. त्यावेळी जैनांच्या काशीत येण्याची इच्छा प्रकट केली असल्याचे मुक्तागिरी संस्थानचे प्रबंधक नेमिचंद महाजन (जैन) यांनी सांगितले.मुक्तागिरीला मुनींनी दिल्या भेटीजैन धर्मीयांची काशी असलेल्या मुक्तागिरी येथे पुरातन काळापासून जैन मुनींनी भेटी दिल्या आहेत. विद्यासागरजी महाराजांनी १९८०, १९९० आणि २०११ अशी तीन वर्षे भेट देऊन चतुर्मास केला. येथे दिगंबर दीक्षासुद्धा नऊ जणांना देण्यात आली. बाहुबलीजी महाराज, भद्रबाहूजी महाराज, तेजभूषणजी महाराज आदी जवळपास सर्वच जैन मुनींनी मुक्तागिरीला भेटी दिली आहे.जैनांची काशी आहे मुक्तागिरीजैन धर्मीयांचे सिद्ध क्षेत्र मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर वसले असून, सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या मुक्तागिरीला जैन धर्मियांची पुरातन ५२ मंदिरे आहेत. सर्व मंदिर वेगवेगळ्या शतकांतील असून, काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे ४०० फूट उंच पर्वतावर आहेत. एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती या ठिकाणी आहे. शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुक्तागिरीचा उल्लेख होतो. अष्टमी, पौर्णिमेला केशर, चंदनाचा वर्षाव येथे होतो. दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते.जैन मुनी तरुण सागरजी महाराज मुक्तागिरीला पाच वर्षांपूर्वी येणार होते. मात्र, नागपूर येथे चतुर्मास कार्यक्रमाला पोहोचण्यास कालावधी अपूर्ण पडत असल्यामुळे कारंजाहून थेट नागपूरला गेले. येथे येण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.नेमिचंद महाजन (जैन)प्रबंधक, मुक्तागिरी संस्थान

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागर