लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : साईनगर भागात झालेल्या चोरीच्या चार घटनांची शाई वाळते न वाळते तोच पाचवी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साईनगरातील हरिचंद्र वासुदेव काळे यांचे बंद घर फोडून चोरांनी ४० ते ५० हजारांचा एैवज लंपास केला. शनिवारी सकाळी ही घटना उघड झाली.साईनगर परिसरातील रहिवासी हरिचंद्र वासुदेव काळे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असता, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोराने १५ हजार रुपये रोख, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीचे काही शिक्के व सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर असा मुद्देमाल लंपास केला. त्याच रात्री शेजारचे बोरखडे व कडू यांच्या घरीसुद्धा कोणीच नसल्याची संधी साधत चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, त्या ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागले नाही. पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी रहिवाशांची मागणी आहे.
साईनगरातील घरे चोरट्यांकडून लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 01:17 IST
साईनगर भागात झालेल्या चोरीच्या चार घटनांची शाई वाळते न वाळते तोच पाचवी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साईनगरातील हरिचंद्र वासुदेव काळे यांचे बंद घर फोडून चोरांनी ४० ते ५० हजारांचा एैवज लंपास केला.
साईनगरातील घरे चोरट्यांकडून लक्ष्य
ठळक मुद्देपंधरवड्यात पाच घटना। पोलिसांसमोर आव्हानाची मालिका