SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून तन्वी वानखडे अव्वल; १०० टक्के गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 08:06 PM2020-07-29T20:06:10+5:302020-07-29T20:06:36+5:30

इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून टॉपर ठरलेली तन्वी प्रदीप वानखडे हिला आयआयटी क्षेत्रात करियर करायचे आहे.

Tanvi Wankhade tops from Amravati district | SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून तन्वी वानखडे अव्वल; १०० टक्के गुण

SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून तन्वी वानखडे अव्वल; १०० टक्के गुण

googlenewsNext
ठळक मुद्देसीताबाई संगई कन्या शाळेची विद्यार्थिनी


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून टॉपर ठरलेली तन्वी प्रदीप वानखडे हिला आयआयटी क्षेत्रात करियर करायचे आहे. तिने १२ वीच्या परीक्षेत टॉपर राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. देशातील टॉप आयआयटीमधून तिला कम्प्यूटर इंजिनीअरिंग करावयाचे असल्याचे तिने लोकमतला मुलाखती दरम्यान सांगितले.
तन्वीला परीक्षेतून ४९८ व क्रीडा/कलेचे २ असे एकूण ५०० गुण मिळाले आहे. ती जिल्ह्यातून टॉपर ठरली आहेत. शाळेत घेतलेल्या अभ्यासाची नियमित उजळणी आणि गृहपाठात ठेवलेले सातत्य यामुळे आपण हे यश मिळविल्याचे तिने सांगितले. तिचे वडील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील एमसीव्हीला शिक्षक, तर आई गृहिणी आहेत. मोठा भाऊ शंतनू अभियांत्रिकीला आहे. आपण लोकमतमधून जनरल नॉलेजचे धडे गिरवल्याचे ती म्हणाली.

Web Title: Tanvi Wankhade tops from Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.