तन्मय, करिश्मा, पल्लवी अव्वल

By Admin | Updated: July 17, 2015 00:18 IST2015-07-17T00:18:38+5:302015-07-17T00:18:38+5:30

‘लोकमत’बालविकास मंच व अभ्यासा इंग्लिश स्कूलच्यावतीने सांस्कृतिक भवन येथे आयोजित चित्रकला स्पर्धेतील मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले.

Tanmay, Karisma, Pallavi Top | तन्मय, करिश्मा, पल्लवी अव्वल

तन्मय, करिश्मा, पल्लवी अव्वल

चित्रकला स्पर्धा : ‘लोकमत’, अभ्यासा स्कूलचे आयोजन
अमरावती : ‘लोकमत’बालविकास मंच व अभ्यासा इंग्लिश स्कूलच्यावतीने सांस्कृतिक भवन येथे आयोजित चित्रकला स्पर्धेतील मुलांना बक्षिस वितरण करण्यात आले. ‘अ’ गटातूून अभ्यासा स्कूलच्या तन्मय धर्माळे याने तर ‘ब’ गटातून नारायणदास लढ्ढा हायस्कूलच्या करिश्मा भेरडे तर ‘क’ गटातून सेंट जवेरिअस हायस्कूलची पल्लवी कताईत हिने प्रथम बक्षिस मिळविले. अभ्यासाचे असिस्टंट डायरेक्टर रहिशा गावंडे, को-आॅर्डीनेटर पूजा उमेकर, पीआरओ अमिन यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. संचालन राजकन्या कोल्हे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रियंका मॅडम व नीलेश ठाकूर यांनी केले. ‘अ’ गटातून द्वितीय क्रमांक यवतमाळ पब्लिक स्कूलच्या गुंजन सोनीने तर अभ्यासाच्या स्वराली भगत हिने तृतीय क्रमांक पटकावला. मदर्स पेटची हर्षिता जोशी चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली. ‘ब’ गटातून गोल्डन किड्सचा जिवतेश बागडे याने द्वितीय, ज्ञानमाता हायस्कूलचा आर्यन वाघमारे याने तृतीय क्रमांक पटकावला. ‘क’ गटातून नारायणदास लढ्ढाची दिव्या बागडे व साक्षी लिखार यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Tanmay, Karisma, Pallavi Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.