तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचा गलथान कारभार
By Admin | Updated: September 28, 2015 00:23 IST2015-09-28T00:23:36+5:302015-09-28T00:23:36+5:30
घुइखेड गावात तीन ते चार महिन्यांपासून भुरट्या चोराची टोळी सक्रिय झाली आहे. दिवसागणिक चोरीच्या घटना घडत असून अद्यापही तळेगाव दशासर पोलिसांना चोराचा तपास लागला नाही.

तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचा गलथान कारभार
टोळी सक्रिय : एकाच रात्र तीन चोरी, दोन लाखांचा ऐवज लंपास
घुईखेड : घुइखेड गावात तीन ते चार महिन्यांपासून भुरट्या चोराची टोळी सक्रिय झाली आहे. दिवसागणिक चोरीच्या घटना घडत असून अद्यापही तळेगाव दशासर पोलिसांना चोराचा तपास लागला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन सुस्त असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे.
घुइखेड गावात अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना दिवसागणिक घडत आहेत. २ सप्टेंबर २०१५ रात्री तीन घरी चोरीच्या घटना घडली असून दोन लाख रुपयाचा मालाचा ऐवज लंपास केला आहे. श्रीकृष्ण रामदास मेश्राम यांच्या घराचा दरवाजा तोडून ३० ग्रॅम सोने, ५ ग्रॅम चांदीचे सिक्के नगदी रक्कमेची चोरी झाली. तसेच शेख अनिस खा हमीद खा (केलेवाले) यांच्या घरुन लोखंडी पेटीत ठेवलेले दीड लाख रुपये व लावा कंपनीचा मोबाइल चोरीस गेला तर शिवदास बनसोड यांचे घर ही फोडले विशेष म्हणजे श्रीकृष्ण मेश्राम यांच्या घरी तीन महिन्यांअगोदारही चोरीचा प्रयत्न झाला होता. तसेच मागील महिन्यात ३ पानटपरीचे शटर तोडून नगदी रुपये व साहित्याची चोरी झाली होती. त्याचा तपासही थंड बस्त्यात असल्योन तळेगाव पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाले आहे. परत कालच रात्री खारोगळ नाल्याजवळील डी.पी. तील अंदाजे १०० लीटर आॅईल चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
घुइखेड हे गाव चांदूर रेल्वे तालुक्यातील मोठे गाव असून या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. तसेच घुइखेड धामक ही गावे संवेदनशील समजली जातात घुइखेड येथे असलेली पोलिस चौकी मागील अनेक वर्षांपासून बंद असल्याने अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीला ऊत आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावात चोरीच्या घटना घडत असून अद्यापपर्यंतही तळेगाव पोलिसांना चोराचा शोध घेता आला नसल्याने पोलिस सुस्त चोर मस्त असल्याची चर्चा गावकऱ्यामध्ये होत होत आहे.
नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुठलीही अवैध वाहतूक होऊ नये म्हणून देवगाव चौकीवर वाहतूक नियंत्रण चौकी देण्यात आली आहे. परंतू या चौकीचा ही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र दिसत आहे. (वार्ताहर)