शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर सिलेंडर घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 19:03 IST

निवडणूक संपली की भाव वाढ हे काही योग्य नाही,  त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला.

ठळक मुद्देमहागाईच्या विरोधात अमरावतीत ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन

अमरावती : पाच राज्यातील निवडणुका संपताच अपेक्षेप्रमाणे देशात महागाईचा विस्फोट झाला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून निवडणुकीचा हंगाम वगळता सातत्याने महागाई वाढत चालली आहे. खोट बोल आणि रेटून कर अस केंद्र सरकारचं चाललं असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या व अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला. 

आज (दि. ४ एप्रिल) अमरावती येथील इर्विन चौकात ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनात डोक्यावर सिलेंडर घेऊन त्या मोदी सरकारच्या महागाई विरोधातील ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलनात सहभागी झाल्या. तसेच त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर  निषेध करीत घोषणाही दिल्या.

निवडणूक संपत नाही तोच पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच महागले. ही भाव वाढ हे काही योग्य नाही,  त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. तसेच केंद्र सरकारच्या दुजाभावामुळे केंद्र आणि राज्य हा संघर्ष या देशाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने एवढी महागाई वाढवणं हे अपेक्षित नाही, हे त्रासदायक आहे. तसेच, जे काही केंद्र सरकार करतं ते सगळ सोन्याहून पिवळं आणि राज्य सरकार एकदम गटारमधली, ही जी पद्धत सुरू झाली ते देशासाठी चांगलं नाही. जे अधिकार केंद्राचे आहेत ते केंद्राचे आहेच पण जे अधिकार राज्याचे आहे ते राज्याचेच आहेत. हा संघर्ष या देशाला कुठे नेऊन ठेवेल अजून तुकडे पाडेल का देशाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे, असेही त्या म्हणाल्या. संविधानाला कस तोडता येईल याच्याकडे केंद्र सरकारचे संपूर्ण लक्ष केंद्रित असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते आणि जनता  मोठया संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाYashomati Thakurयशोमती ठाकूरFuel Hikeइंधन दरवाढInflationमहागाई