बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

By Admin | Updated: September 18, 2016 00:18 IST2016-09-18T00:18:55+5:302016-09-18T00:18:55+5:30

मूकबधिर विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीवर कठोर करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा,..

Take strict action against the child at suppressing child | बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

अमरावती : मूकबधिर विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीवर कठोर करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून शनिवारी करण्यात आली. १५ सप्टेंबर रोजी बुधवारा येथील मूकबधिर विद्यालयात दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर आरोपी दीपक भाऊराव उघडे याने अतिप्रसंग केला. 
हे अमानवी कृत्य करणाऱ्या दिपक उघडेवर कठोर कारवाई करून याप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, तसेच या आरोपीने आणखी काही मुलीवर अशाप्रकारे लैंगिक अत्याचार केलेत का, याचा शोध घ्यावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष संतोष बद्रे, बडनेरा शहराध्यक्ष प्रविण डांगे, उपशहराध्यक्ष संजय गव्हाळे, सुरज बरडे, बबलू आठवले, शाम धाने, गुड्डु मनोहर, शैलेश सुर्यवंशी, राजू वानखडे, अमोल भुले, वैभव बगवारे आदिंनी केली.

Web Title: Take strict action against the child at suppressing child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.