तहसीलसमोर सायंकाळी ६ वाजेनंतर हॉकर्स झोनला परवानगी

By Admin | Updated: December 24, 2015 00:17 IST2015-12-24T00:17:29+5:302015-12-24T00:17:29+5:30

येथील तहसील कार्यालयासमोर हॉकर्स व्यवसायीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे.

Before Tahsil on 6 o'clock in the evening the Hawker's Zone permission | तहसीलसमोर सायंकाळी ६ वाजेनंतर हॉकर्स झोनला परवानगी

तहसीलसमोर सायंकाळी ६ वाजेनंतर हॉकर्स झोनला परवानगी

आयुक्तांचा निर्णय : पोलीस, महसूल विभागाची नाहकरत घेणार
अमरावती : येथील तहसील कार्यालयासमोर हॉकर्स व्यवसायीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. आता सायंकाळी ६ वाजेनंतर तहसीलसमोर हॉकर्स झोनला परवानगी देण्याबाबतचे आदेश त्यांनी निर्गमित केले आहे. मात्र पोलीस, महसूल विभागाची नाहरकत घेतली जाईल, अशी अट लादल्या गेली आहे.
तहसील कार्यालयासमोर हॉकर्स व्यवसायिकांना अतिक्रमण निर्मूलन पथकाने मनाई केल्याचा पार्श्वभूमिवर हॉकर्स व्यवसायिकांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला होता. बुधवारी हॉकर्स व्यवसायिकांनी स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत यांची भेट घेऊन व्यवसाय करण्याबाबत येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. दरम्यान हॉकर्स व्यवसायिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात. बुधवारी सायंकाळच्या सुमारास हॉकर्सना व्यवसाय करण्यास लगाम लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला असता यावेळी महापालिका कर्मचारी आणि हॉकर्स व्यवसायिकांमध्ये वाद देखील झाला. रोजगारासाठी जागा उपलब्ध करुन द्या, ही मागणी हॉकर्स व्यवसायिकांनी रेटून धरली. तर दुसरीकडे तहसीलसमारे व्यवसाय करुन देणार नाही, ही भूमिका प्रशासनाची होती. वाद विकोपाला जाण्याची स्थिती निर्माण होत असताना आयुक्त गुडेवार यांनी तहसीलसमोरील जागेवर आता सायंकाळी ६ वाजेनंतर हॉकर्सना व्यवसाय करण्याची परवानगी देण्याबाबतचे आदेश बुधवारी उशिरा काढले आहेत. महापालिका सहायक संचालक नगर रचना सुरेंद्र कांबळे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना कार्यवाही करण्याचे कळविले आहे.

Web Title: Before Tahsil on 6 o'clock in the evening the Hawker's Zone permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.