प्लॅटफार्मवर ये-जा करणे महागले
By Admin | Updated: March 19, 2015 00:21 IST2015-03-19T00:21:41+5:302015-03-19T00:21:41+5:30
नातेवाईक किंवा कुणाला रेल्वे गाडीवर सोडायचे असल्यास आता प्लॅटफार्मवर ये- जा करण्यासाठी १० रुपये लागणार आहेत.

प्लॅटफार्मवर ये-जा करणे महागले
अमरावती : नातेवाईक किंवा कुणाला रेल्वे गाडीवर सोडायचे असल्यास आता प्लॅटफार्मवर ये- जा करण्यासाठी १० रुपये लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मची तिकीट पाच रुपयांऐवजी १० रुपये केल्यामुळे प्रवाशांवर ‘बुरे दिन’ आले आहे. १ एप्रिलपासून प्लॅटफार्मची तिकीट महागणार आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात सर्वसाधारण प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफार्मच्या तिकीटदरात १ एप्रिलपासून दुप्पट वाढीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्लॅटफार्मचे दर पाच रुपये होते. मात्र, नवीन निर्णयाने ते १० रुपये करण्यात आले आहे. दुसरीकडे अमरावती- बडनेरा पॅसेंजरचे प्रवास भाडे अवघे पाच रुपये आहे. आता प्रत्येक सदस्यांसाठी १० रुपये मोजण्याचा प्रसंग ओढावणार आहे. रेल्वे स्थानकावर येताना वाहनतळ, प्लॅटफार्म अशा वेगवेगळ्या दराचा प्रवाशांना सामना करावा लागणार आहे. प्लॅटफार्मवर अनेकांचा राजरोस मुक्त संचार राहतो. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. मात्र प्लॅटफार्मवर ये- जा करणाऱ्यांनी तिकीट घेतले नसेल तर त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करावी, असे आदेशीत केले आहे. प्लॅटफार्म तिकीट संदर्भात रेल्वेच्या सर्व यंत्रणांना कामी लागण्याचे निर्देश दिले आहेत.