शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नीलच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: November 6, 2014 22:47 IST

वय वाढले; पण समज आली नव्हती. बाबा नाहीत. आईला चिंता वाटायची. माझ्या आयुष्याची घडी बसावी यासाठी आईने शेतीवर कर्ज काढले. दोन महिन्यांपूर्वी पानटपरी सुरू केली. नव्या स्वप्नांच्या दुनियेत

हल्ल्यात सर्वस्व गेले : आताशा आयुष्याला मिळाली होती दिशाअमरावती : वय वाढले; पण समज आली नव्हती. बाबा नाहीत. आईला चिंता वाटायची. माझ्या आयुष्याची घडी बसावी यासाठी आईने शेतीवर कर्ज काढले. दोन महिन्यांपूर्वी पानटपरी सुरू केली. नव्या स्वप्नांच्या दुनियेत मी रमलो होते. बुधवारी अचानक हल्ला झाला नि काही कळायच्या आतच माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. यशोदानगर ते दस्तुरनगर रस्त्यावरील राणा कॉम्पलेक्सनजिक पानसेंटर चालविणारा तरुण स्वप्निल काळमेघ(२४) गुरुवारी फ्रेजरपुरा पोलीसठाण्यात आला होता. उद्धवस्त झालेल्या पानटपरीबाबत त्याला पोलिसांना वर्दी द्यायची होती. ठाण्याच्या बाहेर बसला असताना त्याच्या मनात माजलेले काहूर लक्षात आले. 'लोकमत'ने त्याच्याशी चर्चा केली. मनात दाटलेल्या भावना ज्वालामुखीप्रमाणे उफाळून येऊ लागल्या. शब्दांतून लढवय्य बाणा प्रतिबिंबित होत असतानाच अचानक त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यांना धारा लागल्या.सावंगा या गावातील मूळचा रहिवाशी असलेला स्वप्नील तारुण्यातील अधिक काळ उनाडपणातच रमला. लग्नाचे वय झाले. तरीही जबाबदारीचे भान त्याला आलेले नव्हते. मारामाऱ्याही त्याच्यासाठी नवख्या नव्हत्या. आपल्यानंतर मुलाचे काय? मिळकत नाही, मुलगी मागायची कशी? अशी चिंता स्वप्निलच्या जन्मदात्रीला रोज छळत होती. या महागाईच्या जमान्यात एकटीनेच घराचा गाडा रेटणाऱ्या त्या माऊलीने गावातील तीन एकर शेतीवर कर्ज काढले. स्वप्निलला कुठलीही मदत न मागता तिनेच सारी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली. लाखभर रुपयांचे कर्ज मिळविले. स्वप्निलला छानसे पानसेंटर सुरू करून दिले. स्वप्निलचे मन रमेल, ग्राहकांनाही यायला प्रसन्न वाटेल, अशा आकर्षक पद्धतीने सजविलेल्या त्या पानसेंटरचे नाव स्वप्निलने 'एस.के. पॅलेस' असे ठेवले. दोन महिन्यांपासून त्याचा व्यवसाय नियमित आणि नफ्यात सुरू होता.