शिष्यवृत्ती परीक्षेत ‘शाश्वत’चे सुयश
By Admin | Updated: July 5, 2017 00:51 IST2017-07-05T00:51:50+5:302017-07-05T00:51:50+5:30
राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘शाश्वत’चे सुयश
राज आचलिया प्रथम : १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये स्थानिक शाश्वत स्कूलने संपूर्ण जिल्ह्यात बाजी मारली आहे. या शाळेचा विद्यार्थी राज आचलिया याने शहरी विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शाश्वत शाळेतील ४२ विद्यार्थ्यांपैकी एकूण १६ मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा शिष्यवृत्तीचा निकाल ३.५ टक्के लागलेला असताना शाश्वत शाळेचा निकाल हा ४० टक्के लागला आहे. शाश्वत शाळेच्या अनुष्का पोटोडे, अदिती वऱ्हाडे, प्लक्षा पांडे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक पटकावत शाळेच्या १६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.
राज्यात पहिल्यांदाच इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत विविध बदल देखील करण्यात आले होते. अचुकता, समयसूचकता, निर्णयक्षमता, बुद्धीमत्ता, इंग्रजी, गणित व मराठी विषयातील कौशल्यावर आधारित प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले होते. मात्र, यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. असे असूनही शाश्वत स्कूलचे १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. शाश्वत टीमच्या अमृता गायगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या इतर विद्यार्थ्यांमध्ये सुबोध कानबाले, पर्णवी यादगिरे, मृण्मयी जोशी, श्रेया साकला, आदित्य मामर्डे, मेघना बजाज, सृष्टी पाटील, देवांश कडू, अमेय तायडे, आदित्य बाभुळकर, उर्वी सावरकर, आरोह जोशी यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका वैशाली ठाकूर, शिक्षिका विद्या डेरे व अनुप्रिया मंडकुमारे यांच्यासह अमृता गायगोले यांना देतात.