संशयित तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST2021-06-06T04:09:54+5:302021-06-06T04:09:54+5:30

अमरावती : माजी आमदार सुनील देशमुख यांच्या रुक्मिणीनगरातील घराजवळ फिरणाऱ्या संशयास्पद तरुणाला राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. आकाश ...

Suspected youth arrested | संशयित तरुणाला अटक

संशयित तरुणाला अटक

अमरावती : माजी आमदार सुनील देशमुख यांच्या रुक्मिणीनगरातील घराजवळ फिरणाऱ्या संशयास्पद तरुणाला राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. आकाश सुभा इंगोले (२०, रा. काठीपुरा, अंजनगाव सुर्जी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------------

कहकशा कॉलनीत चोरीचा प्रयत्न

अमरावती : नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील कहकशा कॉलनीत लोखंडी पलंग चोरुन नेण्याचा प्रयत्न झाला. नियाज मोहम्मद ताज मोहम्मद (३५) यांनी घरासमोर लोखंडी पलंग ठेवला होता. शाहरुख अली हारूण अली (३५) व वसीम खोबरा व गोलू (सर्व रा. अकबरनगर) हे तिघे तो पलंग वाहनावर टाकून चोरून नेत होते. नियाज हे आरोपींच्या मागे धावल्याने त्यांनी पलंग टाकून पळ काढला. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------

व्यंकय्यापुरा येथे तडीपाराला अटक

अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व्यंकय्यापुरा येथील शुक्रवारी एका तडीपार आरोपीला अटक केली. रहमत खान बिस्मील्ला खान (५० रा. चिलम छावणी) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना तडीपार रहमत खान हा फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो विनापरवानगी शहरात दाखल झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी रहमत खानला फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविला.

---------------------------------

Web Title: Suspected youth arrested