शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

आश्चर्यच... कापडाचा ‘बीआयएस’ दर्जा, मात्र शासन म्हणते, ४५ रुपयांत गणवेश शिवून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:57 IST

Amravati News अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून गणवेश दिला जातो. मात्र, कापड खरेदी व शिवणकामासाठी प्रतिविद्यार्थी केवळ ३०० रुपये खर्च दिला जाणार आहे.

ठळक मुद्देही तर शिक्षकांचीच परीक्षा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कसा मिळेल चांगला दर्जाचा गणवेश

गणेश वासनिक

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून गणवेश दिला जातो. या गणवेशासाठी लागणारे कापड हे ‘बीआयएस’ दर्जाचे हवे आहे. मात्र, कापड खरेदी व शिवणकामासाठी प्रतिविद्यार्थी केवळ ३०० रुपये खर्च दिला जाणार आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देताना शिक्षकांचीच परीक्षा पाहिली जाणार आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक राजेंद्र पवार यांनी २८ जानेवारी रोजी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. गणवेशाचा कापड हा बीआयएस दर्जाप्रमाणे आयएस १५८५२ (२००९), आयएस १५८५३ (२००९) क्रमांकाचा खरेदी करावा लागणार आहे. कापडाच्या दर्जाबाबतची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध आहे. समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशाचा दर्जा राखण्यासाठी बीआयएस स्टॅडर्न्ड क्रमांक लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. मात्र, कापडाचा ‘बीआयएस’ दर्जा अन् ३०० रुपये हे कसे शक्य आहे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे. गणवेशाच्या शिवणकामासाठीच १५० ते २०० रुपये लागत असताना, ‘बीआयएस’ दर्जा कसा राखला जाईल? त्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे का, या विवंचनेत शिक्षक आहेत.

खुल्या प्रवर्गातील मुले गणवेशापासून वंचितसमग्र शिक्षा अभियानातून शालेय गणवेश हा एससी, एसटी प्रवर्ग आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांनाच उपलब्ध करून दिला जातो. मात्र, खुला, ओबीसी, एनटी संवर्गातील मुलांना गणवेश मिळत नाही. केवळ मुलींनाच गवणेश दिला जातो. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटपात अस दुटप्पी धोरण अवलंबविले जात आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना या धोरणाचा फटका बसत आहे.

शासन म्हणते, ४५ रुपयांत गणवेश शिवून घ्या

समग्र शिक्षा अभियानातून प्रतिगणवेश ३०० रुपये खर्च देते. यात कापड खरेदी आणि शिवणकाम खर्चाचा समावेश आहे. मात्र, गणवेश शिवणकामासाठी केवळ ४५ रुपये मंजूर करण्यात आले आहे. वाढत्या महागाईनुसार शिवणकामाचेही दर महागले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा आणि पटसंख्या कायम राहावी,यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक स्थानिक स्तरावर ‘ॲडजस्टमेंट’ करतात, असे चित्र राज्यभर आहे.

प्रशासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देताना कसरत होते. बरेचदा पालकांचा रोष सहन करावा लागतो. मात्र, मध्यम मार्ग काढताना विद्यार्थ्यांचा कॉन्व्हेंट दर्जा कायम ठेवावा लागतो. शिक्षकांना वर्गणी करून बूट, टाय द्यावा लागतो. ३०० रूपयात गणवेश होत नाही, हे वास्तव आहे.-तुळशीराम धांडे, मुख्याध्यापक, पिंपळखुटा, दर्यापूर पंचायत समिती.

टॅग्स :Schoolशाळा