शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच....! बिबट्या जिन्याच्या पायऱ्या चढून चक्क एसआरपीएफ कार्यालयात आला, सीसीटीव्हीत कैद

By गणेश वासनिक | Updated: June 22, 2025 18:41 IST

सीसीटीव्हीमध्ये कैद, शनिवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनीटांची घटना, शिकारीसाठी फिरला पण काही नाही भेटलं तर परतला

अमरावती: बिबट्याच्या नागरी वस्तीत संचार ही बाब अमरावतीकरांसाठी काही नवीन नाही. मात्र शनिवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनीटांनी एक बिबट शिकार शोधण्यासाठी चक्क अमरावती येथील राज्य राखीव पोलिस दल क्रमांक ९ च्या दुमजली इमारतीत कार्यालयात चक्क फेरफटका मारुन गेला. जिन्यावरून पायऱ्या चढत मोठ्या दिमाखदारपणे इमारतीत फिरणारा हा बिबट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर रविवारी वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने एसआरपीएफचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, परंतु बिबट कुठेच दिसून आला नाही.

अमरावती विद्यापीठ, राज्य राखीव दल, वडाळी परिसर, तपोवन, संजय गांधीनगर, मंगलधाम कॉलनी आदी नागरी वस्तीचा भाग हा वडाळी वनपरिक्षेत्राच्या जंगलालगत आहे. त्यामुळे या भागात अधूनमधून बिबट आढळून येतो. अमरावती विद्यापीठ परिसरात तर बिबट्याचे वास्तव्य ही नित्याचीच बाब आहे. असे असले तरी बिबट्याने मनुष्याला हानी पोहोचवली, अशी एकही घटना गेल्या पाच ते सहा वर्षात निदर्शनास आली नाही. नागरी वस्तीत शिकारीसाठी येणे आणि सावज शोधले की परत जंगलात जाणे हा बिबट्याचा नेहमीचा शिरस्ता आहे. अशाच प्रकारे शनिवारी मध्यरात्री बिबट शिकारीसाठी एसआरपीएफ कार्यालयात आले असावे, असा अंदाज वन विभागाच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख अमोल गावनेर यांनी लोकमत' बोलताना व्यक्त केला आहे.शनिवारी मध्यरात्री बिबट एसआरपीएफ कार्यालयाच्या ईमारतीत फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्याकरिता रेस्क्यू पथक घटनास्थळी पाठविले होते. मात्र त्य भागात बिबट दिसला नाही. तो लगतच्या अमरावती विद्यापीठाच्या भिंतीवरून विद्यापीठ परिसरातील झुडपामध्ये गेला असावा.- वर्षा हरणे, आरएफओ, वडाळी.एसआरपीएफ परिसरात बिबट्याचा अनेकदा संचारराज्य राखीव पोलिस दल वसाहत परिसरात गत काही वर्षांपासून अनेकदा बिबट येतो आहे. लगतच असणाऱ्या वडाळी, पोहरा जंगल परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल परिसराला लागून असणाऱ्या काही निवासस्थानाजवळ सायंकाळीसुद्धा बिबट दिसून येतो. झुडपात, एखाद्या खड्ड्यात बिबट दडून बसतो. राज्य राखीव पोलिस दल वसाहतीमधील अनेक कुत्र्यांची शिकार बिबट्यांनी केली आहे. तपोवन परिसरात डॉक्टर कॉलनी येथे १५ जूनला बिबट्याने गेटवरून घराच्या आवारात उडी घेत कुत्र्याची शिकार केली होती.एसआरपीएफ परिसरात फिरणारा बिबट आता कार्यालयाच्या इमारतीत शिरला. तेव्हा येथे कर्तव्यावर असणारे कर्मचारी सुदैवानं त्याच्या समोर आले नाहीत म्हणून मोठा अनर्थ टाकला. कर्मचारी वसाहत परिसरात महिला, लहान मुलांमध्ये बिबट्याची दहशत आहे.- मनीष घोडेस्वार, पोलिस उपनिरीक्षक एसआरपीएफ

टॅग्स :leopardबिबट्या