सुप्रियाताईंनी अमरावतीत केले वटवृक्षाचे पूजन.. उखाणाही घेतला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 20:25 IST2022-06-14T20:10:46+5:302022-06-14T20:25:00+5:30
Amravati News वटपौर्णिमेचे पूजन विधवा महिलांसोबत करून राष्ट्रवादीच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी अमरावतीत एक नवा पायंडा घालून दिला.

सुप्रियाताईंनी अमरावतीत केले वटवृक्षाचे पूजन.. उखाणाही घेतला..
गणेश वासनिक
अमरावतीः वटपौर्णिमेच्या दिवशी पूजनाचा अधिकार हा केवळ सौभाग्यवती स्त्रियांनाच नसून तो विधवा स्त्रियांनाही आहे हा नवा पायंडा पाडत, राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत वडाच्या झाडाचे पूजन केले आणि उखाणाही घेतला. त्यांच्या या पवित्र्यामुळे अमरावतीतील महिलांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.
मंगळवारी असलेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी विधवा स्त्रियांसोबत वडाची पूजा केली. वडाला प्रदक्षिणा घालताना त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला. त्यावर सुप्रियाताईंनी, ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास, सदानंदराव फर्स्ट क्लास’ असे म्हणत उपस्थित महिलांच्या टाळ्या मिळवल्या. यावेळी ज्येष्ठ महिलांनी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दीर्घायुष्य लाभो, असे आशीर्वाद दिले.