बेलोरा ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुप्रिया उतखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:09 IST2021-07-03T04:09:16+5:302021-07-03T04:09:16+5:30

फोटो पी ०२ चांदूरबाजार चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा गावात ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया गिरीश उतखेडे यांची वर्णी लागली ...

Supriya Utkhede as Belora Gram Panchayat Deputy Panch | बेलोरा ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुप्रिया उतखेडे

बेलोरा ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुप्रिया उतखेडे

फोटो पी ०२ चांदूरबाजार

चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा गावात ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया गिरीश उतखेडे यांची वर्णी लागली आहे. मंगेश ऊर्फ भैया ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

वर्षभरापूर्वी मंगेश ऊर्फ भैया ठाकरे यांनी उपसरपंचपद स्वीकारले होते. यावेळी दिलेला शब्द पाळत एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. यामुळे बेलोरा ग्रामपंचायतीने राजकारणात दिलेला शब्द पाळण्याची प्रथा कायम ठेवली आहे. ठाकरे यांनी राजीनामा देताच सुप्रिया गिरीश उतखेडे यांची वर्णी लागली आहे. यावेळी सरपंच दीपाली अरुण गोंडीकरसह ग्रामविकास अधिकारी भांडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन पावडे, सुरेंद्र विधाते, संजय निमकर, महेंद्र रंदले, शरद पावडे, सुचिता मंगेश राऊत, सविता मदन राव घरडे, प्रियांका राऊत, सविता वानखडे, नाजीमा परवीन मुक्तार, शारदा खवले, वृषाली ठाकरे, सुधाकर गोमकले, तुषार उर्फ बबलू देशमुख, अरुण गोंडेकर, शरद विधाते, स्वप्नील भोजने, गिरीश उर्फ बंटी उतखेडे, पवन झगडे, शाम कडू, अभि कडू, सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Web Title: Supriya Utkhede as Belora Gram Panchayat Deputy Panch