'डाटा एन्ट्री'नंतर होणार बायोमेट्रिक धान्यपुरवठा
By Admin | Updated: March 2, 2015 00:34 IST2015-03-02T00:34:55+5:302015-03-02T00:34:55+5:30
शिधाधारक नागरिकांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप शिधाकार्डधारकांची डाटा एंट्री, आधार कार्ड व ...

'डाटा एन्ट्री'नंतर होणार बायोमेट्रिक धान्यपुरवठा
अमरावती : शिधाधारक नागरिकांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप शिधाकार्डधारकांची डाटा एंट्री, आधार कार्ड व बँक लिंक पूर्ण होण्याची असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. डाटा एंट्रीसाठी ३१ मार्चची डेडलाईन (ईआयसीएमएस) या प्रक्रियेने देण्यात आली असल्याने त्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार बायोमेट्रीक पद्धतीने पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
बायोमेट्रीक रेशनिंग योजना राज्यात काही जिल्ह्यातील तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. मात्र ही योजना निधीअभावी रखडली आहे. रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने ही योजना काही तालुक्यात सुरू केली. परंतु निधीची उपलब्धता नाही, कंपनीचे कंत्राट संपले, त्यामुळे योजनाच बंद पडल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
दुकानदारांसाठी रेशनिंग पद्धत अत्यंत त्रासदायक आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आली. ही योजना शिरूर तालुक्यात यशस्वी झाल्यामुळे ती जिल्ह्यात राबवायचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला. यासाठी निधीची वानवा आहे. मात्र ३१ मार्चनंतर डाटाएंट्रीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविली जाणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)