गुरुवारी अवकाशात दिसणार ‘सुपरमून’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:01:10+5:30

पृथ्वीवरून नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरणे येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० किमीच्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. तो पृथ्वीपासून दरवर्षी ३.८ सेंटिमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग क मी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिलिसेंकंदने मोठा होईल.

 'Supermoon' to appear in space on Thursday | गुरुवारी अवकाशात दिसणार ‘सुपरमून’

गुरुवारी अवकाशात दिसणार ‘सुपरमून’

ठळक मुद्दे हौशी खगोल अभ्यासकांची माहिती : २०२० मध्ये चौथ्यांदा खगोलीय घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : २०२० मधील चौथा ‘सुपरमून ’ गुरुवारी ७ मे रोजी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार आहे. पृथ्वी-चंद्र अंतर नेहमी सरासरी ३ लाख ८५ हजार किमी असते. परंतु, या दिवशी हे अंतर थोडे कमी राहील. त्यामुळे चंद्रबिंब मोठे व प्रकाशमान दिसेल. चंद्र पृथ्वीच्याजवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यांसारख्या घटना घडू शकतात, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.
पृथ्वीवरून नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरणे येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० किमीच्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. तो पृथ्वीपासून दरवर्षी ३.८ सेंटिमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग क मी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिलिसेंकंदने मोठा होईल.
चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. ती दुर्बिणीमधून चांगल्या प्रकारे पाहता येतात. ७ मे रोजी रात्री दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी आवश्य बघावा. हा सुपरमून साध्या डोळ््यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.

Web Title:  'Supermoon' to appear in space on Thursday