अमरावती शहर काँग्रेसतर्फे सुनील देशमुख यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST2021-07-11T04:10:39+5:302021-07-11T04:10:39+5:30
अमरावती : शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रथम आगमनाप्रसंगी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. ...

अमरावती शहर काँग्रेसतर्फे सुनील देशमुख यांचा सत्कार
अमरावती : शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रथम आगमनाप्रसंगी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी १५० पेक्षा जास्त पदाधिकारी व सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांचा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शंकरराव हिंगासपुरे, वसंतराव साऊरकर, मुजफ्फर मामू, अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, माजी शहराध्यक्ष किशोर बोरकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती. राजकमल चौकातील चौबळ वाड्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रवेश घेणाऱ्या सर्वांचे काँग्रेसचा तिरंगी दुपट्टा देऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक अस्मा फिरोज खान, शोभा शिंदे, सुनीता भेले, वंदना कंगाले, सलीम बेग, प्रदीप हिवसे, अनिल आर माधवगाडिया, हफिजाबी युसूफ शाह, नूर खान, कोमल बोथरा, संजय वाघ, विनोद मोदी, नरेश बोधानी, शरद दातेराव, सलीम मिरावाले, झिया खान, शम्स परवेज, देवयानी कुर्वे, राजा बांगडे, नीलेश गुहे, डॉ. दिनेश गवळी, अशोक डोंगरे आदी उपस्थित होते.