शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सारांश सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

धारणी : येथील एका २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे प्रलोभन देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. आरोपीने तिचा गर्भपात घडवून ...

धारणी : येथील एका २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे प्रलोभन देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. आरोपीने तिचा गर्भपात घडवून आणला. डिसेंबर २०२० ते १८ जून दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी शेख मलिक शेख रहीम (२५, रा. धारणी) याच्याविरुद्ध बलात्कार, अ‍ॅट्राॅसिटी अन्वये गुन्हा दाखल केला.

--------------

पाटिया येथे तरुणाला मारहाण

धारणी : तालुक्यातील पाटिया येथील राजू बेलसरे (२३) याला गावातीलच दादू जावरकर याने मारहाण केली. १८ जून रोजी क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

बहिणीचा अपघाती मृत्यू, भावाविरुद्ध गुन्हा

धारणी : तालुक्यातील टिटंबा येथे १९ जून रोजी झालेल्या दुचाकी अपघातात गावातील मंगलू धांडे यांची पार्वती नामक विवाहित मुलगी ठार झाली. याप्रकरणी दुचाकीचालक तथा मृताचा भाऊ सत्यम मंगलू धांडे (टिटंबा) याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

--------------

हरिसाल येथे तरुणाला मारहाण

धारणी : तालुक्यातील हरिसाल येथील बंटी चौहान (३४) याला गावातीलच दोघांनी मारहाण केली. शिवीगाळ करताना हटकल्यानंतर १८ जून रोजी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी उमेश चव्हाण व प्रभू गिरी (दोन्ही रा. हरिसाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

धोत्रा येथे महिलेवर ब्लेडने वार

तळेगाव दशासर: धामणगाव रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील एका ३६ वर्षीय महिलेच्या डाव्या हातावर ब्लेडने वार करण्यात आले. यात ती गंभीर जखमी झाली. तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी अंकुश भोयर (रा. धोत्रा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. तिघांचा खून करण्याची धमकीदेखील देण्यात आली.

--------------

धानोरा म्हाली येथे चोरी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील धानोरा येथील चंद्रशेखर इंगळे (५६) यांच्या घरातून रोख दोन हजार रुपये, चांदीचा गोफ व सोन्याची नथ असा एकूण ३५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. १९ जून रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

बोरगाव धांदे येथे तरुणाला मारहाण

मंगरूळ दस्तगीर : बोरगाव धांदे येथील प्रशांत चाफले (२७) याला जुन्या वैमनस्यातून मारहाण करण्यात आली. १८ जून रोजी बोरगावात ही घटना घडली. याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी योगेश सवाळे (५२, बोरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

वाघोळा येथील विवाहितेचा छळ

नांदगाव खंडेश्वर: तालुक्यातील वाघोळा येथील एका २६ वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. माहेरहून पैसे आण, अन्यथा फारकत देण्याची धमकी देण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी किशोर भलावी व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

पहूर येथून सोन्याची पोत लंपास

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील पहूर येथील गणेश बेले यांच्या घरातून १७ हजार ४९१ रुपयांची सोन्याची पोत लंपास करण्यात आली. १८ जून रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

महिलेला अश्लील शिवीगाळ

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील बोरी शिवारात ३६ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ व विनयभंग करण्यात आला. १९ जून रोजी ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी पंजाब मारोतराव हांडे (५०, रा. बोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

कोल्हा येथे इसमावर विळ्याने हल्ला

आसेगाव पूर्णा : अचलपूर तालुक्यातील कोल्हा येथील एका ३७ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तिच्या पतीच्या डोक्यावर विळा मारण्यात आला. १९ जून रोजी ही घटना घडली. आसेगाव पूर्णा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी राजेश श्यामराव पाखरे (रा. कोल्हा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

चांदूर बाजारात महिलेला मारहाण

चांदूर बाजार : येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. १९ जून रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी मनोज गायकवाड (२१, रा. इंदिरानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

काजळी शिवारातून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : तालुक्यातील काजळी येथील राजेंद्र कुहाडे यांची एमएच २४ एझेड ६९१५ या क्रमांकाची दुचाकी माधान ते काजळी रोडवरील शिवाराच्या धुऱ्याहून लंपास करण्यात आली. १९ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी १९ जून रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

आलमपूर फाट्यावरून दुचाकी जप्त

शिरजगाव कसबा : नजीकच्या करजगाव येथील गौरव पाटील (३१) यांची एमएच २७ एजे ४८८० या क्रमांकाची दुचाकी आलमपूर फाट्याहून लंपास करण्यात आली. १० मे रोजी ही घटना घडली होती. शिरजगाव पोलिसांनी १९ जुन रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------