सारांश छोट्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST2020-12-12T04:29:36+5:302020-12-12T04:29:36+5:30

नेरपिंगळाई : शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रिद्धपूर येथील देवेंद्र दिलीप वानखडे (३२) यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला. ८ ...

Summary short news | सारांश छोट्या बातम्या

सारांश छोट्या बातम्या

नेरपिंगळाई : शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रिद्धपूर येथील देवेंद्र दिलीप वानखडे (३२) यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला. ८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भागवत जगदेव वानखडे (४१, रिध्दपूर) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वानखडे हे वाद सोडविण्यास गेले होते.

-------------

वरूडच्या सनातन कॉलनीत चोरी

वरूड : स्थानिक सनातन कॉलनी येथील रहिवासी मिलिंद डंबाळे यांच्या घरातून ८५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. ५ ते ९ डिसेंबरदरम्यान ही घटना घडली. डंबाळे हे कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते. याप्रकरणी वरूड पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

सालबर्डी पाळा मार्गावर अपघात

मोर्शी : सालबर्डी ते पाळा मार्गावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. १३ नोव्हेंबर रोजी हा अपघात घडला होता. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा १६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ गोविंद धुर्वे (रा. झालनडोह, मध्यप्रदेश) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

लवादा येथे तरूणास मारहाण

धारणी : तालुक्यातील लवादा येथील रामू सज्जुलाल भिलावकेर (३५) यांना सळाखीने मारहाण करण्यात आली. ८ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. धारणी पोलिसांनी संजू प्रेमलाल भिलावेकर याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

दोन लाख द्या; अन्यथा लग्न मोडेन!

धारणी : दोन लाख रुपये व नवीन दुचाकी देत असाल, तर लग्न होईल, अन्यथा लग्न मोडले, असा समजा, अशी धमकी तालुक्यातील एका वधुुपित्याला देण्यात आली. २१ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला. तालुक्यातील बिबामल येथील एका ६० वर्षीय गृहस्थाच्या मुलीचे लग्न अंकुश फुलचंद भार्वे (रा. घुटी) याचेश जुळले होते. मात्र काही दिवसांनी आरोपी अंकुश व त्याचा पिता फुलचंद भार्वे हे घुटी येथे पोहोचले. २ लाख रुपये व नवीन दुचाकीची मागणी केली. देत नसाल, तर लग्न तुटले असे समजा, असे बोलून ते निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी भार्वे कुटुंबातील दोन महिला सदस्यांनी फोनवर रक्कम व दुचाकीची मागणी केली. ती तजवीज करणे शक्य नसल्याने वधुपित्याने धारणी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी भार्वे पितापुत्रासह दोन महिलांविरूद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

दिया फाट्यावर अपघात, चुलतबंधू जखमी

धारणी : परतवाडा मार्गावरील दिया फाट्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत संजय कासदेकर व त्यांचा चुलतभाऊ जखमी झाले. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास हा अपघात घडला. धारणी पोलिसांनी एमएच १८ बी ०१०६ या चारचाकी वाहनाच्या चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

तरुणीचा विनयभंग

चिखलदरा : तालुक्यातील आडनदी शेतशिवारात एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. चिखलदरा पोलिसांनी आरोपी अनिल रामचंद्र गुडधे (२५, धामणगाव गढी) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------

शिरजगाव अर्डक येथून बैलजोडी लंपास

चांदूरबाजार : तालुक्यातील शिरजगाव अर्डक येथील वैभव अर्डक (३५) यांच्या मालकीची बैलजोडी लंपास करण्यात आली. ८ डिसेंबर रोजी रात्रीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी चांदुरबाजार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

खोलापूर कसबा येथे चोरी

भातकुली : तालुक्यातील खोलापूर कसबा येथील प्रतिक कविटकर यांच्या घरातून २९ हजार २०० रुपयांचा सोन्याचांदीचा ऐवज चोरीला गेला. ८ डिसेंबर रोजी दुपारी १ ते २ च्या सुमारास हा प्रकार घडला. चोराने त्यांच्या घरातून सोन्याची पोत, अंगठी, कानातले मनी व चांदीच्या तोरड्या चोरून नेल्या. खोलापूर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

कोंडवर्धा येथे तरुणास मारहाण

ब्राम्हणवाडा थडी : चांदूरबाजार तालुक्यातील कोंडवर्धा येथे प्रफुल राजेंद्र धोंडे (२८, रा. इनायतपूर) याला काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून १९ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी हर्षल सुरेंद्र धोंडे (२०) व अरुण गुणवंत धोंडे (दोन्ही रा. इनायतपूर) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

पिंपळगाव बैनाईतून बकऱ्या लंपास

मंगरुळ चव्हाळा : तालुक्यातील पिंपळगाव बैनाई येथून शरद दाते यांच्या मालकीच्या २२ बकऱ्या लंपास करण्यात आल्या. ९ डिसेंबर रोजी रात्रीदरम्यान ही घटना घडली. चोरी गेलेल्या बकऱ्यांची किंमत ७२ हजारांच्या घरात असल्याचे दाते यांनी मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

--------------

चांदूररेल्वे बसस्टॅन्डवर चोरी

चांदूर रेल्वे : येथील बसस्टँडवरून देवगावकडे जाणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून २१ हजार रुपये रोख लांबविण्यात आली. ९ डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. मार्डा येथील स्वप्निल सुधाकर तालनकर हे बसस्टॅड परिसरात असताना हा प्रकार घडला. चांदूररेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

मु-हा देवी येथे मारहाण

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील मु-हादेवी येथील मेहसिन शहा मुन्तू शहा (२७) याला मारहाण करण्यात आली. सांभारात शिरलेल्या बकºया बाहेर काढ, असे म्हटल्यावर ९ डिसेंबर रोजी हा वाद झाला. रहिमापूर पोलिसांनी याप्रकरणी शरिफशहा नियामत शहा, अनिस शहा शरिफ शहा, रहमत शहा शरिफ शहा (सर्व रा. मु-हादेवी) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

अंजनगाव सुर्जीत तरूणास मारहाण

अंजनगाव सुर्जी : दर्यापूर अंजनगाव मार्गावरील एका बारसमोर कुलदिप दिनकर बोराडे (२७, रा. विहिगाव) याला चौघांनी बेदम मारहाण केली. ८ डिसेंबर रोजी पुर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी संदीप साहेबराव देशमुख, योगेश भालतिडक, श्याम भालतिडक, पप्पू वाट (चौघेही रा. अंजनगाव) यांचेविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

सांगवा येथे तरूणास मारहाण

खल्लार : येथील फाट्यावर सुरज वरठे (रा. सांगवा खुर्द) याला रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ९ डिसेंबर रोजी दुपारी घडलेल्या या प्रकरणी खल्लार पोलिसांनी आरोपी राहुल सगणे, कैलास सगणे (दोन्ही रा. सांगवा बु) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

Web Title: Summary short news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.