सारांश न्युज इनबॉक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:47+5:302020-12-16T04:29:47+5:30
फोटो पी १४ अंजनगाव अंजनगावात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार अंजनगाव सुर्जी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ...

सारांश न्युज इनबॉक्स
फोटो पी १४ अंजनगाव
अंजनगावात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
अंजनगाव सुर्जी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपालिका सभागृहात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार बळवंत वानखडे, हाजी शफीक सेठ, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख राजू आकोटकर, विकास येवले, नगरसेवक नासीर भाई, शेख रहीम, उमेश टांक, नगर परिषदेचे माजी सभापती आबिदभाई, आदींची उपस्थिती होती.
-----------------
आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा
अमरावती : राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा १४ मार्च रोजी होणार आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. शाळांची ऑनलाईन नोंदणी व आवेदने स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन आवेदने २५ डिसेंबरपर्यंत शंभर रुपये शुल्कासह स्वीकारण्यात येणार आहेत.
---------------
स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्जाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
अमरावती : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदायाधारित संस्था व संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतमाल, शेळी व परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मूल्यसाखळी विकासासाठी भागीदारी उपप्रकल्प व बाजार संपर्कवाढ उपप्रकल्पासाठी अर्ज करता येईल.
-----------------
जिल्हाधिकाऱ्यांकडून बडनेरा चाईल्ड लाईन कार्यालयाची पाहणी
अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिशा संस्थाद्वारे संचालित बडनेरा रेल्वे चाईल्ड लाईनला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी हे चाईल्ड लाईन अॅडव्हयझरी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून या प्रकल्पाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेत असतात. या भेटीदरम्यान त्यांनी चाईल्ड लाईन स्टाफ व इतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
----------------
जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक
भातकुली : राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
---------------------------
धामणगावात तहसीलदार भळगटिया रुजू
धामणगाव रेल्वे : दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या येथील तहसीलदारपदावर गौरवकुमार भळगटिया रुजू झाले आहेत. भगवान कांबळे यांची कोल्हापूर येथे उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली. त्यानंतर दोन महिन्यांपासून तहसीलदाराचे पद रिक्त होते.
------------------------
पाच दिवसांनंतर धारणीत सूर्यदर्शन
धारणी : मेळघाटातील वातावरण गुरुवारपासून ढगाळ होते आणि शनिवार व रविवारी पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला होता. मंगळवारी सकाळी धारणी शहराचे स्वागत धुक्याने केले आणि सकाळी नऊच्या सुमारास दरम्यान सूर्यदर्शन झाले. वातावरणातील बदलाने गृहिणी सुखावल्या. ढगाळ वातावरणामुळे पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला होता.
------------
बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचा आधार
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने पाच ऑनलाईन रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्यात जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी १ हजार ५४ रिक्त पदे अधिसूचित केली होती. यामुळे
बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा आधार मिळाला.
---------------
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह
अमरावती : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढविणे, ऊर्जा संवर्धन करणे व ऊर्जा बचत करणे आदी गोष्टींना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येतो. १४ ते २१ डिसेंबरपर्यंत हा सप्ताह होईल.