सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:16+5:302021-05-30T04:11:16+5:30
रिद्धपूर : सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड यांनी केले ...

सारांश बातम्या
रिद्धपूर : सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरावेत. त्यासाठी ५ हजार प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहेत.
-----------------
उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णांसाठी देवदूत
मोर्शी : उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी कोविड रुग्णांसाठी वरदान ठरले आहे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कळसकर यांच्या मार्गदर्शनात कोविड इन्चार्ज डॉ. सचिन कोरडे, डॉ.रोशन बालबंशी, आरोग्य सहायक विनायक नेवारे, विनय शेलुरे, आरोग्य कर्मचारी सुजित वानखडे,अंजुमा खान, सुलू सलामे, वैष्णवी जोशी, शिवानी हटवार, ज्ञानेश्वर कोरडे, अंकिता हिवरे, राजश्री धुर्वे, आकाश जवंजाळकर, नौशाद हबीब शाह हे सेवा देत आहेत.
-----------------