सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST2021-05-30T04:10:57+5:302021-05-30T04:10:57+5:30

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे ४० वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. २७ मे रोजी ही घटना घडली. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे ४० वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. २७ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी सै. इरफान सै. मोहम्मद (४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

चांदूर रेल्वे : तालुक्यातील एका महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी ग्रामसेवक तुळशीराम जाधव, उपसरपंच संदीप उमरे व ब्रम्हकुमार चव्हाण (तिघेही रा. चिरोडी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४, २९४, ५०६ व अ‍ॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ५ मार्च ते २० मे दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

----------------

पुसला बिटमधून जाळी लंपास

शेंदूरजनाघाट: पुसला बिटमधील वनखंड १०८८ मधून पाच हजार रुपये किमतीची तारेची जाळी लंपास करण्यात आली. २६ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी वनरक्षक संजय वाघमारे (५०) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

हुंड्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

परतवाडा: येथील एका माहेरवासिनीचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. ५ जुलै ते २७ मे या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी शेख वासिक, शेख सोहेल, शेख मोईन, शेख मिस्त्री व महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

ऑटोरिक्षाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

खल्लार : दर्यापूर तालुक्यातील नरदोडा बस स्टॉप ते हॉटेल दरम्यान ऑटोरिक्षाने दिलेल्या धडकेत संतोष टाले (रा. नरदोळा) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. १७ एप्रिल रोजी सायंकाळी हा अपघात घडला होता. खल्लार पोलिसांनी याप्रकरणी एमएच ३० पी ८९५६ या क्रमांकाच्या ऑटोरिक्षाचा चालक नीलेश नामदेव रोडकर (नरदोळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

विद्यापीठात अ‍ॅम्बूलन्सचे कुलगुरूंच्या हस्ते लोकार्पण

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्रासाठी घेतलेल्या सुसज्ज अ‍ॅम्ब्यूलन्सचा लोकार्पण सोहळा कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते फीत कापून झाला. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, वित्त व लेखा अधिकारी भारत कऱ्हाड, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपअचल प्रबंधक अनिल गिरसावळे, शाखा प्रबंधक आभिन जांभूळकर, व्यवसाय विकास अधिकारी सुमीत नगराळे, विद्यापीठाच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात आदी उपस्थित होते.

-----------

फोटो पी २९ मनपा

एमआयडीसी परिसरात १०० जणांची आरटीपीसीआर

बडनेरा : अमरावती एमआयडीसी परिसरात एकूण १०० नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी करवून घेण्यात आली. सदर मोहिमेत सहायक आयुक्त विशाखा मोटघरे तसेच ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू ढिक्याव, स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक, मिथून उसरे, सोपान माहुलकर, इम्रान खान तसेच बिट प्यून विशाल कैथेल, प्रवीण उसरे, सुपरवाइजर, राहुल परिहार, संजय निकम, निखिल अडसपुरे उपस्थित होते.

---------------------

२०३ नागरिकांची कोरोना तपासणी

अमरावती: बाजार समिती व कंवरनगर चौक परिसरात आरोग्य विभागाच्या मोबाईल व्हॅन चमूद्वारे रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेण्यात आली. यामध्ये एकूण २०३ नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करून घेण्यात आली. या ठिकाणी स्वास्थ्य निरीक्षक धनिराम कलोसे, मनीष हडाले, प्रीती दाभाडे, महेश पळसकर, अनिकेत फुके, योगेश कंडारे, वसुली लिपिक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

----------------

वाठोडा शुक्लेश्वर येथे तरुणाला मारहाण

भातकुली : तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे राहुल प्रकाश केकतकर (२८) याला विटेने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी स्वप्निल महादेव रावेकर (२६, रा. वाठोडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------

अंजनगावातून घोडा चोरून नेला

अंजनगाव सुर्जी : येथील झांझनपुरा भागातून नौशाद शेख अल्लाउद्दीन (३५) यांच्या मालकीचा ५० हजार रुपये किमतीचा घोडा लंपास करण्यात आला. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी संशयित आरोपी सुफीयान बेग नासिर बेग, शेख साकिब शेख सादिक (दोन्ही रा. नवगज्जी प्लॉट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

नळाचे पाणी भरण्यावरून मारहाण

मोर्शी : नळावर पाणी भरण्याच्या वादातून विजयसिंह बैस (६०) यांना मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करण्यात आली. नेरपिंगळाई येथे ही घटना घडली. शिरखेड पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

पावसाळ्याआधी व्हावे प्रवासी निवारे

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव ते दर्यापूर मार्गावर नवीन रस्ता बांधकाम काम झाल्याने या मार्गावरील एकाही फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने भर उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रत्येक फाट्यावरचे प्रवासी निवारे जुने झाले असल्याने व रस्ता रुंदीकरणात येत असल्याने जमीनदोस्त करण्यात आले. आता किमान पावसाळ्याआधी ते व्हावेत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

-----------------

फोटो पी २९ सावरकर

शाम चौकात सावरकर जयंती

अमरावती : हिंदू हुंकार संघटनेतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक श्याम चौक स्थित त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व मिठाई वाटप करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश गोयनका, हिंदू हुंकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बोपुलकर, अभिनव हिरूळकर, मयूर दोडके, निखिल चव्हाण, रोशन गौड, आशीर्वाद गौड, सुमीत अनासाने, गणेश गौड, नितीन अनासाने उपस्थित होते.

-------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.