सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:55+5:302021-05-04T04:04:55+5:30

चांदूर बाजार : येथील वृंदावन कॉलनीमधून एमएच २७ बीके ५५३५ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ३० एप्रिल रोजी दुपारी ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

चांदूर बाजार : येथील वृंदावन कॉलनीमधून एमएच २७ बीके ५५३५ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ३० एप्रिल रोजी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी संतोष तायडे (४६) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

काजळीतून बैल लांबविला

चांदूर बाजार : तालुक्यातील काजळी येथील आशिष टिंगणे यांच्या मालकीचा २५ हजार रुपये किमतीचा बैल लंपास करण्यात आला. ३० एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी १ मे रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

खल्लारमधून तीन बैल लांबविले

दर्यापूर : तालुक्यातील खल्लार येथील इमरान बेग यांचे दोन बैल व आकाश बुरघाटे यांच्या मालकीचा एक गोऱ्हा अशी तीन जानावरे दोर कापून चोरून नेण्यात आले. ३० एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. खल्लार पोलिसांनी इमरान बेग यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

रामतीर्थ येथे महिलेला मारहाण

येवदा : दारू पिण्यास १०० रुपये न दिल्याने एका ३५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. ३० एप्रिल रोजी रामतीर्थ येथे ही घटना घडली. याप्रकरणी येवदा पोलिसांनी आरोपी रामेश्वर कोरे (४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीपासृून आपल्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

--------------------

-----------------------

पुसला येथे गॅसच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक

पुसला : येथील सुनील गोविंदराव सुरजुसे (३५, रा. पुसला) याने ३३ लोकांचे रिकामे सिलिंडर व गॅस रिफिलिंगसाठी घेतलेल्या १२ हजार ८०० रुपयांसह एकूण ८३ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार शेंदूरजनाघाट पोलिसांत नोंदविण्यात आली. ११ मार्च ते १ मे दरम्यान ही घटना घडली. चंद्रशेखर कोल्हे यांच्या तक्रारीवरून सुनीलविरुद्ध कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

------------------

गणपती मंदिर फोडण्याचा प्रयत्न

अंजनगाव सुर्जी : येथील शिक्षक कॉलनी स्थित गणपती मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. ३० एप्रिल रोजी ही घटना उघड झाली. दानपेटीच्या बाजूला पेचकस व मंदिरातील साहित्य अस्तव्यस्त दिसले. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी उमाकांत लाडोळे (६०) यांचे तक्रारीवरून १ मे रोजी याप्रकरणी संशयित आकाश इंगोले (२२, काठीपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

परतवाड्यात तरुणाला फसवणूक

परतवाडा : येथील कालंकामाता झोपडपट्टी भागात साजिद खान हमीद खान (३०) याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. २९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी आरोपी आकाश उईके, सुरेश उईके (कालंकामाता झोपडपट्टी) यांच्याविद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

हनवतखेडा येथे चाकूने वार

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा ऑटोरिक्षा थांब्यावर गुलाबसिंग जगन क्षिशान (६०) यांच्या हाताच्या ढोपरावर चाकूने वार करण्यात आला. ३० एप्रिल रोजी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मंगेश गुलाबसिंग क्षिशान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

अपघातग्रस्त इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

शिरजगाव कसबा : खरपी ते करजगाव रोडवरील भालेवाडी येथे कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १४ एप्रिल रोजी हा अपघात घडला होता. संजय साहेबराव उईके (४५, रा. करजगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शिरजगाव पोलिसांनी ३० एप्रिल रोजी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------------

दुचाकी अपघातात तरुण ठार

तिवसा : कौंडण्यपूर ते मिर्चापूर रोडवरील कडुनिंबाच्या झाडाला धडकून दुचाकीस्वार प्रफुल ढोरे (३०, रा. अंजनसिंगी) याचा मृत्यू झाला. ३० एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास हा अपघात घडला. प्रफुल हा एमएच २७ एडब्ल्यू ७४८७ या दुचाकीनी अंजनसिंगीहून वरखेड जात असताना, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी मृताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

वणी बेलखेडा येथे महिलेला मारहाण

ब्राम्हणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा येथे एका ४९ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

ग्रामीण भागात चुलीचा वापर वाढला

शेंदूरजनाघाट : जरी घरोघरी गॅस सिलिंडर आला असला तरी घरच्या स्वयंपाकगृहाच्या बाजूला छोटी-मोठी चूल वापरली जाते. तिचा उपयोग स्वयंपाकासह पाणी गरम करण्यासाठी केला जातो. या चुलीचे इंधन म्हणून पूर्वीपासून लाकूड व शेणाच्या गोवऱ्या यांचा वापर केला जात आहे. गोवऱ्यांचा वापर इंधन म्हणून चुलीसाठी केला जातो.

-----------

विद्यापीठात महाराष्ट्र दिन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन व विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व संवैधानिक अधिकारी उपस्थित होते.

-------------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.