सुकन्या योजनेला लाभार्थीच मिळेना

By Admin | Updated: July 29, 2014 23:34 IST2014-07-29T23:34:18+5:302014-07-29T23:34:18+5:30

मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह रोखले जावेत आणि शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या हेतूने राज्य शासनाने ‘सुकन्या योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात १ जानेवारी २०१४ पासून योजना सुरू झाली आहे.

Sukanya Yojana is available to the beneficiary | सुकन्या योजनेला लाभार्थीच मिळेना

सुकन्या योजनेला लाभार्थीच मिळेना

सात महिन्यांत एकही नोंद नाही : जनजागृतीचा अभावी
जितेंद्र दखणे - अमरावती
मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह रोखले जावेत आणि शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या हेतूने राज्य शासनाने ‘सुकन्या योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात १ जानेवारी २०१४ पासून योजना सुरू झाली आहे. मात्र पुरेशा जनजागृतीअभावी योजनेला गेल्या सात महिन्यांत एकही लाभार्थी मिळाला नाही.
मुलींच्या कल्याणासाठी महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या या योजनेला उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ सर्व गटातील दारिद्र्यरेषेखाली प्रत्येक मुलींसाठी असून एका कुटुंबातील फक्त दोनच अपत्यांकरिता योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी किंवा ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करता येतो.
मात्र सुकन्या योजनेची माहिती प्रशासनाकडून जनतेपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यात आली नाही. यामुळेच योजना लागू होण्यास सात महिने होऊन देखील जिल्ह्यातून एका देखील कुटुंबातून मुलींच्या भविष्याकरिता योजनेंतर्गत अर्ज प्राप्त झालेला नाही.स्थानिक स्तरावर योजनेचा प्रचार करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

Web Title: Sukanya Yojana is available to the beneficiary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.