‘सुसाईड इन कस्टडी’ने वाढविले पोलिसांचे ‘हार्टबिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST2021-08-21T05:00:00+5:302021-08-21T05:00:58+5:30

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा  पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सागर श्रीपत ठाकरे याला अटक केली. १८ रोजी त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली. १८ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्याला राजापेठच्या लॉकअपमध्ये टाकण्यात आले होते. 

Suicide in custody raises police 'heartbeat' | ‘सुसाईड इन कस्टडी’ने वाढविले पोलिसांचे ‘हार्टबिट’

‘सुसाईड इन कस्टडी’ने वाढविले पोलिसांचे ‘हार्टबिट’

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यातील ‘सुसाईड ईन कस्टडी’ने  पोलीस यंत्रणेचे हार्टबिट वाढविले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून एकीकडे तपास सुरू असताना, राजापेठच्या सहायक पोलीस आयुक्तांनी देखील समांतर चौकशी आरंभली आहे. शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्यात ‘रूटिन वर्क’ सुरू असले, तरी आरोपीच्या कोठडीतील आत्महत्येचा धसका अनेकांच्या चेहऱ्यावर ठळकपणे जाणवला. या घटनेचा तपास ‘सुमोटो’ सीआयडीकडे गेला असताना, संभाव्य कारवाईची तलवार नेमकी कुणावर कोसळणार, अशी साशंक भीती अनेकांना सतावत आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा  पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सागर श्रीपत ठाकरे याला अटक केली. १८ रोजी त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली. १८ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्याला राजापेठच्या लॉकअपमध्ये टाकण्यात आले होते. 
‘ते’ चौकशीच्या फेऱ्यात
घटनेवेळी ड्युटी ऑफीसर म्हणून पीएसआय, दोन  रायटर, तपास मदतगार, संगणकावर  व स्टेशन डायरीवर दोन महिला पोलीस कर्तव्यावर होत्या. हवालातसमोर चार अधिक एक गार्ड अशी ड्युटी होती. असे असताना सागरने सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केल्याने हाकेच्या अंतरावर असलेली ही सारी मंडळी नेमकी काय करीत होती, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे तेदेखील कारवाईच्या कक्षेत येण्यार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालातीच्या भिंतीला लागूनच पोलीस कर्मचारी हजर असतात.

हवालातीच्या दाराच्या आर्कला बांधले शर्ट?
पोलीस सूत्रानुसार, राजापेठ पोलीस ठाण्यातील हवालातीला एकमेव लोखंडी दार आहे. ते सुमारे १० ते १२ फुट उंचीचे असावे. दाराच्या अगदी वरच्या भागाला आरोपीने शर्ट बांधला. त्या शर्टची बाहीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी गुरूवारीच उघड केली होती. त्यावेळी हवालातीत अन्य एक आरोपी होता, तो त्यावेळी निद्राधीन होता. तसा जबाब त्याने दिला आहे. 

ठाणेदारांचे कॅबिनमध्ये सीसीटीव्ही स्क्रिन
राजापेठ पोलीस ठाण्यात एकूण १६ सिसीटिव्ही कॅमेरा आहेत. ते ठाणेदारांच्या कक्षातील स्क्रिनला जोडण्यात आले. पैकी १४ कॅमेरे सुरू आहेत. हवालातमध्ये असलेल्या एका सिसिटिव्हीचा देखील त्यात समावेश आहे. पोलीस ठाणे, हवालातीपासून ठाण्यात कोणते वाहन, कोणता इसम प्रवेशला, हे ठाणेदार आपल्या कक्षातील स्क्रिनवर पाहू शकतात. 

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
सागर ठाकरेविरूद्ध गुन्हे नोंदविले ते फ्रेजरपुरा पोलिसांनी, अटकही त्यांच्याच दप्तरी. लॉकअप नसल्याने त्याला राजापेठ लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्या लॉकअपमध्ये सागरने स्वत:ला संपविले. राजापेठ पोलिसांची प्रचंड धावाधाव झाली. राजापेठमधील डीओपासून, डायरी अंमलदार, गार्ड  व ठाणेदारांना देखील सीआयडी चौकशी, बयानाला सामोरे जावे लागणार आहे.

 

Web Title: Suicide in custody raises police 'heartbeat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस