डिझेलने जाळून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:48+5:302021-06-28T04:10:48+5:30

वाठोडा शुक्लेश्वर (अमरावती) : भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावेड येथील २० वर्षीय युवकाने डिझेल अंगावर घेऊन ...

Suicide by burning with diesel | डिझेलने जाळून घेऊन आत्महत्या

डिझेलने जाळून घेऊन आत्महत्या

वाठोडा शुक्लेश्वर (अमरावती) : भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावेड येथील २० वर्षीय युवकाने डिझेल अंगावर घेऊन स्वतःला जाळून घेतले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सौरभ विनोद डहाके (२०, रा. नावेड) असे मृताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दुय्यम ठाणेदार विलास बोपटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. हेड कॉन्स्टेबल संजय शेंडे, दीपक धंदर, विशाल कौलकर, संतोष लोहणकर या घटनेचा पुढील तपास करीत आहे.

===Photopath===

270621\20210627_104346.jpg

===Caption===

फोटो

Web Title: Suicide by burning with diesel