शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणुका काही वार्डात अचानक स्थगित करणे हा लोकशाहीला धक्का देणारा निर्णय'; यशोमती ठाकुर यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 14:54 IST

राज्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रांतील निवडणुका अचानक काही वार्डमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय पूर्णतः मनमानी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनवलेली चुकीची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ठाकुर यांनी म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यभरात प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने काही निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. न्यायालयातील याचिकांमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी या निर्णयावरून हल्लाबोल केला आहे. 

राज्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रांतील निवडणुका अचानक काही वार्डमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय पूर्णतः मनमानी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनवलेली चुकीची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ठाकुर यांनी म्हटले आहे.

शरद पवारांसमोर नवा पेच, अजित पवारांसोबत जाण्याला प्रशांत जगताप यांचा विरोध; थेट राजकारण सोडण्याचे संकेत

या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रातील नागरिकांचा लोकशाही हक्क बाधित होत असून, कोणताही पुरेसा कारणमीमांसा न देता निवडणूक स्थगित करणे हा लोकशाहीला धक्का देणारा प्रकार आहे, अशी टीका ठाकुर यांनी केली.

“कोर्टाच्या स्पष्ट निर्देशांनुसार निवडणुका नियमित पद्धतीने घेणे बंधनकारक आहे. निवडणुका टाळून जनतेला प्रतिनिधी निवडण्यापासून दूर ठेवणे हा अलोकशाही आणि अन्याय निर्णय आहे. तात्काळ कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ठाकुर यांनी केली.

यशोमती ठाकुर म्हणाल्या, अशा निर्णयांमुळे प्रशासनावरचा जनतेचा विश्वास कमी होत असून, सरकार व निर्वाचन आयोगाने ताबडतोब हा निर्णय मागे घेत निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू करावी, अशी मागणी यशोमती ठाकुर यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Yashomati Thakur slams poll postponement, calls it undemocratic.

Web Summary : Congress leader Yashomati Thakur criticized the sudden postponement of some local body elections, deeming it a blow to democracy and a manifestation of collusion between the election commission and the government. She demanded immediate resumption of the election process as per court orders.
टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024BJPभाजपा