ग्रामीण भागात बंद यशस्वी

By Admin | Updated: June 6, 2017 00:04 IST2017-06-06T00:04:11+5:302017-06-06T00:04:11+5:30

शेतकरी संपाला पाठिंबा देत अमरावती जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून शासनाच्या धोरणाविरोधात पुकारण्यात आलेला बंद यशस्वी ठरला आहे.

Successful in rural areas | ग्रामीण भागात बंद यशस्वी

ग्रामीण भागात बंद यशस्वी

अमरावती : शेतकरी संपाला पाठिंबा देत अमरावती जिल्ह्यातील विविध संघटनांनी आंदोलन छेडले असून शासनाच्या धोरणाविरोधात पुकारण्यात आलेला बंद यशस्वी ठरला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयी व मोठ्या गावांत बंदचे पडसाद दिसून आले. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असून संपात फूट पाडण्याच्या सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला. बहुतांश ठिकाणी रस्त्यावर भाजीपाला व दूध फेकण्यात आले व चक्का जाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Web Title: Successful in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.