सीताबाई संगई कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST2020-12-05T04:18:39+5:302020-12-05T04:18:39+5:30
अंजनगाव सुर्जी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत सीताबाई संगई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. ...

सीताबाई संगई कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
अंजनगाव सुर्जी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत सीताबाई संगई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. पूर्व माध्यमिक स्तरावर १३ विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
मोहिनी लाडोळे हिने जिल्हास्तरावर प्रथम स्थान पटकावले. पलक करवा (तिसरे स्थान), युक्ता खंडारे (सहावी), शर्वरी सावरकर (सातवी), अनन्या संगई (दहावी), रिद्धी येवुल (३५), भूमिका घोटे (४६), रुची चांडक (६६), सोनल चौधरी (७८), आर्या काळे (१०५), निधी खरड (१०४), परिका पांढरकर (१२९), वेदांती गुजर (१३४) यांनीही यश मिळविले.
पूर्व प्राथमिक स्तरावर १० विद्यार्थिनी शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरल्या. यामध्ये अनुजा कावरे जिल्हास्तरावर प्रथम स्थानी आली. सानिका तायडे (२३), भूमिका गुजर (२४), जान्हवी हाडोळे (५९), अनुष्का गोस्वामी (१०१), आभा ढोक (१०३), अपेक्षा डोणगावकर (१०४), श्रेया टोकणे (११९), मानसी शहा (१७५), वेदिका टोक (१७६) यांनीही यादीत स्थान मिळविले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक संगई, उपाध्यक्ष अविनाश सगई, सचिव डॉ. उल्हास संगई, सहसचिव विवेक सगई, प्रसाद संगई, मुख्याध्यापक संजय संगई, पर्यवेक्षिका सुरेखा धमाले, हेडाऊ, महाजन, वाघ जावरकर, गोतमारे, खंडारे, दुर्गे आदी शिक्षकगणांनी समाधान व्यक्त केले.