सदस्यांना ‘बजेट’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:13 IST2018-02-24T22:13:13+5:302018-02-24T22:13:13+5:30

जिल्हा परिषदेच्या सदस्यांना अर्थसंकल्पीय (बजेट) सभेची प्रतिक्षा आहे. येत्या २५ ते २८ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातर्फे दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते.

Subscribers wait for 'budget' | सदस्यांना ‘बजेट’ची प्रतीक्षा

सदस्यांना ‘बजेट’ची प्रतीक्षा

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सेस फंडातील निधीकडे लक्ष

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना अर्थसंकल्पीय (बजेट) सभेची प्रतिक्षा आहे. येत्या २५ ते २८ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातर्फे दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. या अंदाजपत्रकात योजनानिहाय तरतूद आणि संभाव्य खर्चाचा ताळमेळ बसविला जातो. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून कोणत्या योजना पूर्णत्वास जातील याचा लेखाजोखा मांडला जातो. सोबतच जिल्हा परिषदेच्या मिळकतीतून प्राप्त होणाºया सेस फंडातूनही विविध योजनांसाठी तरतूद केली जाते. वित्त विभागाने सर्व विभागांना पत्र देऊन त्यांना संभाव्य खर्चाबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. कोणत्या योजनांसाठी किती रुपये लागतील. याचा अंदाज सादर करण्याचे आदेश दिले. सर्व विभागांकडून नियोजित खर्चाची माहिती मिळाल्यानंतर महिन्याच्या शेवटी सर्व विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. त्यात अंदाजपत्रकांचा कच्चा मसुदा तयार होणार आहे. नंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थ समितीच्या सभेत या अंदाजपत्रकाला मूर्त स्वरुप दिले जाणार आहे. अर्थ समितीत साधक बाधक चर्चा झाल्यानंतर हे अंदाजपत्रक अंतिम मान्यतेसाठी झेडपी सर्वसाधारण सभेपुढे मांडले जाणार आहे. यावर्षी २० मार्चपूर्वी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूर होणार आहे.
निधी खर्चाचे आव्हान
दरवर्षी सेस फंडातून शेतकरी लाभार्थ्यांसाठी लाखोंची तरतूद केली जाते. मात्र आर्थिक वर्ष संपत असताना महिला बालकल्याण समाज कल्याण या विभागाचा निधी तसाच पडून राहतो, असा अनुभव आहे. मागील वर्षीचा अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेला निधीही अद्याप पडून आहे.

Web Title: Subscribers wait for 'budget'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.