स्टंट रायडिंगमुळे दुचाकीवरील माय-लेक कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:02 IST2018-09-14T22:01:51+5:302018-09-14T22:02:10+5:30
स्टंट रायडरने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेक खाली कोसळून जखमी झाल्याची घटना नवाथे प्लॉट स्थित बँकेसमोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्टंट रायडरला ताब्यात घेतले होते.

स्टंट रायडिंगमुळे दुचाकीवरील माय-लेक कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टंट रायडरने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेक खाली कोसळून जखमी झाल्याची घटना नवाथे प्लॉट स्थित बँकेसमोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्टंट रायडरला ताब्यात घेतले होते.
शहरात नवशिके तरुण भरधाव वाहने चालवून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करीत आहे. अनेकदा पोलिसांनी स्टंट राइडरवर कारवाईचा बडगा उगारला, मात्र, त्यांच्यावर जरब बसली नाही. शुक्रवारी सायंकाळी एक तरुणी तिच्या आईला मोपेड वाहनावर बसून राजापेठकडून नवाथेनगरकडे जात होती. दरम्यान, नवाथे प्लॉट येथील रस्त्यावरून भरधाव एक स्टंट राइडरने मायलेकीच्या वाहनाला मागून धडक दिली. माय-लेकी खाली पडल्यानंतर नागरिक धावून गेले. त्या दोघीही जखमी झाल्या होत्या. दरम्यान स्टंट राइडरने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, नागरिकांनी पकडले आणि चोप दिला. त्या तरुणाने मोबाइलवर कोणाशी तरी संपर्क करून आणखी काही तरुणांना बोलावून घेतले. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी स्टंट राइडरला ताब्यात घेतले.