शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रशिया आणि युक्रेन या देशांत सुरू झालेल्या युद्धामुळे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसला आहे; तर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहे. गुरुवारी हिमवृष्टी आणि उणे १० डिग्री तापमान असतानासुद्धा अमरावतीचा ऋषभ गजभिये याने रोमानियाची सीमा गाठली, तर स्नेहा लांडगे ही दिल्ली येथे पोहोचल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११ पैकी ६ विद्यार्थी भारतात पोहोचले असून, ५ विद्यार्थी प्रवासात आहेत.युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे. गत तीन दिवसांपासून रोमानिया सीमेवर हिमवृष्टी होत असल्याने सीमा पार करताना जीव मुठीत घेऊन भारतीय व रोमानिया दूतावासांत पोहोचावे लागले. एकूणच भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्वराज गणेश पुंड निवासस्थानी पोहोचला. यावेळी नागरिकांनी त्याचे स्वागत केले.

थंडीचे तीन दिवस जीवन-मरणाचेरोमानिया सीमेवर तीन दिवस हिमवृष्टीमुळे मरणयातना भोगाव्या लागल्या. दूतावासात चांगली वागणूक मिळाली नाही. थंडीमुळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत, अशा संतप्त भावना युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आहेत. सीमा ओलांडताना जीव मुठीत घेऊन वृषभ बाहेर पडला, असे त्याचे वडील वैभव गजभिये यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थी सुखरूप यावे, अशी मनीषा व्यक्त केली.

युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी आतापर्यंत ६ विद्यार्थी भारतात दाखल झाले आहेत. पाच विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी मार्गस्थ आहेत.- आशिष बिजवल, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

ऋषभ याने अतिशय कठीण प्रसंगातून युक्रेनमधून रोमानियाची सीमा ओलांडली आहे. रेल्वे, टॅक्सी यांचा त्याला आधार घ्यावा लागला. अमरावतीत पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. गुरुवारी व्हिडिओ कॉलने त्याने संवाद साधला. विशेष विमान उपलब्ध झाल्यानंतरच भारतात येईल, असे तो म्हणाला.- वैभव गजभिये, अमरावती (ऋषभचे वडील)

अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी कुठे, कसे?- प्रणव पुनसे हा अमरावतीत घरी पोहोचला.- तुषार गंधे बुधवारी रात्री ७ वाजून ३० वाजता व्हिडीओ कॉलवरून हंगेरी बुडापेस्ट शहरात मुक्कामी. - तनिष सावंत बुधवारी रात्री ११ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्काम. - ऋषभ गजभिये हा गुरुवारी सकाळी ११ वाजता रोमानिया सीमेपासून ४० किलोमीटर लांब आहे.- स्वराज पुंड हा गुरुवारी सकाळी दिल्लीवरून विमानाने नागपूरकडे रवाना झाला. रात्री अमरावतीत घरी पोहोचला.- प्रणव भारसाकडे बुधवारी रात्री ८ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्कामी. - मोहम्मद रिजवान बुधवारी रात्री १० वाजता रोमानिया बॉर्डरवरून विमानतळाकडे रवाना झाला.- कुणाल कावरे गुरुवारी सकाळी १० वाजून ३० वाजता दिल्ली येथे पोहोचला आहे.- नेहा लांडगे हिने बुधवारी रात्री टेस्क मॅसेजनुसार ती गुरुवारी दिल्ली येथे पोहोचली.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी