The students of 'question mark' fast | ‘प्रश्नचिन्ह’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण
‘प्रश्नचिन्ह’च्या विद्यार्थ्यांचे उपोषण

ठळक मुद्दे जिल्हा कचेरीत ठिय्या : नुकसानभरपाईची संस्था पदाधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आदिवासी फासेपारधी सुधार समितीच्या मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची इमारत समृद्धी महामार्गा$साठी उद्ध्वत करण्यात आल्यानंतर शाळेतील मुलांचे हाल सुरू आहेत. संरक्षणभिंतीचा अभाव आणि पाण्याचे दुर्भीक्ष यामुळे विद्यार्थ्यांसमोर संकटे निर्माण झाली असून, आपल्या विविध मागण्यांसाठी शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांच्यासह पदाधिकारी व  विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीत शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.
समितीच्या अर्धा एकर मालकीच्या शेतामधूनदेखील समृद्धी महामार्गाचा काही भाग गेला असून, संस्थेच्या मालकीची जागा संपादित करण्यापूर्वी लेखी नोटीसदेखील देण्यात आली नाही. एक एकराच्या जमिनीवर शैक्षणिक प्रकल्प उभा करण्यासाठी पक्के बांधकाम करण्यात आले होते. हे संपूर्ण बांधकाम उदध्वस्त करण्यात आले. या जागेतील एकूण २५० झाडेदेखील तोडून टाकण्यात आली. समृद्धी महामार्गामध्ये संस्थेच्या दोन विहिरी गेल्याने विद्यार्थ्यांसाठी दररोज सहा टँकरने पाणी विकत आणावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी सकाळी ११ पासून शालेय विद्यार्थ्यांचा मतीन भोसले, नूरदास भोसले, मंजू पवार, गजानन पवार हे आंदोलन सहभागी झाले आहेत. न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन करीत राहणार असल्याचे मतीन भोसले याप्रसंगी म्हणाले.


Web Title: The students of 'question mark' fast
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.