विद्यापीठात एमबीए प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:13 IST2021-03-19T04:13:32+5:302021-03-19T04:13:32+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागाच्या गलथान कारभारामुळे एमबीए द्धितीय वर्षापासून काही विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे त्या ...

Students deprived of MBA admission to the university | विद्यापीठात एमबीए प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

विद्यापीठात एमबीए प्रवेशापासून विद्यार्थी वंचित

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागाच्या गलथान कारभारामुळे एमबीए द्धितीय वर्षापासून काही विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने गुरुवारी करण्यात आली.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर एमबीए प्रथम वर्षाला सन २०१८- २०१९ ला प्रवेशित असणाऱ्या सुशांत आखरे, आकाश वानखडे, पूजा शिरभाते, कंचन पांडे यांना एमबीए द्धितीय वर्षापासून सध्या वंचित आहेत. प्रवेशाबाबत एमबीए विभागाने कळविले नाही. एमबीए प्रथम वर्षाच्या गुणपत्रिका मिळविल्या आहेत. मात्र, प्रवेशाची तारीख निघून गेल्याचे कारण पुढे करून दुसऱ्या सत्रात प्रवेश दिला जात नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी न्याय प्रदान करावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांनी केली. यावेळी सुशांत आखरे, आकाश वानखडे, पूजा शिरभाते, कंचन पांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Students deprived of MBA admission to the university