निकालापूर्वीच विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:52 IST2018-05-30T22:52:38+5:302018-05-30T22:52:49+5:30
बारावीत नापास होण्याच्या भीतीपोटी एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ही घटना मंगळवारी रात्री गाडगेनगर ठाण्यांतर्गत शेगाव परिसरात घडली. ऋतुजा दिलीप गवई (१८, रा.शेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

निकालापूर्वीच विद्यार्थिनीची आत्महत्या
अमरावती : बारावीत नापास होण्याच्या भीतीपोटी एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ही घटना मंगळवारी रात्री गाडगेनगर ठाण्यांतर्गत शेगाव परिसरात घडली. ऋतुजा दिलीप गवई (१८, रा.शेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
घटनेच्या माहितीवरून गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर होणार होता. तत्पूर्वीच ऋतुजाने राहत्या घरी गळफास घेतला.निकालाच्या धास्तीने तणावात येऊन तिने जीवन संपविल्याची माहिती तिचे काका (मावसा) उमेश दिघाडे यांनी दिली. हिच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.