विद्यार्थी, पोलिसांनी जाणून घेतली फॉरेन्सिक लॅबची कार्यपद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:44 IST2018-02-02T01:44:05+5:302018-02-02T01:44:30+5:30

न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीची जनजागृती करण्यासाठी 'फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'चे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व पोलिसांना प्रादेशिक न्यायसहायक वैत्रानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे मार्गदर्शन करीत आहेत.

Student, Police Learned The Methodology of Forensic Labs | विद्यार्थी, पोलिसांनी जाणून घेतली फॉरेन्सिक लॅबची कार्यपद्धती

विद्यार्थी, पोलिसांनी जाणून घेतली फॉरेन्सिक लॅबची कार्यपद्धती

ठळक मुद्देजनजागृती सप्ताह : न्यायवैद्यक प्रयोगशाळा उपसंचालकांचे मार्गदर्शन

ऑनलाईन लोकमत
अमरावती : न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीची जनजागृती करण्यासाठी 'फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'चे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व पोलिसांना प्रादेशिक न्यायसहायक वैत्रानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे मार्गदर्शन करीत आहेत.
'फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'मध्ये पोलीस तपासात फॉरेन्सिकचे महत्त्व व पोलिसांनी कशाप्रकारे काम करावे, याबाबत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छ व सुंदर प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीविषयी माहिती त्यांनी दिली. चार दिवस चालणाऱ्या या जनजागृती सप्ताहात शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे २५० विद्यार्थी, नरसम्मा महाविद्यालयाचे बीएस्सी फायनलचे १०० विद्यार्थी, अकोला येथील बीएएमएसचे ७० विद्यार्थी, शिवाजी विज्ञानचे एमएस्सीचे ६० विद्यार्थी, विद्यापीठातील एमएस्सीचे ६० विद्यार्थी व विद्याभारती महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. सोबत या सर्व महाविद्यालयांतील शिक्षक वृंदानेही फॉरेन्सिकची लॅब कार्यपद्धती जाणून घेतली. शहर पोलीस आयुक्तालयातील ३९ व अमरावती ग्रामीण क्षेत्रातील २० पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांच्या तपासाकार्यासाठी फॉरेन्सिक लॅबमधील कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतले. शुक्रवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अकोला येथील फॉरेन्सिक सायन्सचे विद्यार्थी व इंजिनीअरिंगचे विद्यार्थी उपस्थित राहणार असून, त्यांना उपसंचालक विजय ठाकरे फॉरेन्सिकच्या कार्यप्रणालीची माहिती देणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा असणाऱ्या या प्रयोगशाळेची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. वर्षभर या प्रयोगशाळेत प्रवेशबंदी असत. आतादेखील केवळ जनजागृती करण्याच्या दृष्टीने या प्रयोगशाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

‘फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'मध्ये विद्यार्थी व पोलिसांना फॉरेन्सिकच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देण्यात आली. फॉरेन्सिक लॅबचे महत्त्व सर्वांना परिचित व्हावे, या अनुषंगाने शासनाचा हा उपक्रम आहे.
- विजय ठाकरे, उपसंचालक, न्यायवैद्यक प्रयोगशाळा

Web Title: Student, Police Learned The Methodology of Forensic Labs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.