शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महापरीक्षा पोर्टल विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:00 AM

र्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी किंवा एमपीएससी सारखा स्वतंत्र सरळसेवेचा आयोग स्थापन करावा, परीक्षेच्या अवाजवी परीक्षा शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लाचखोरावर कडक कारवाई करावी,.........

ठळक मुद्देकलेक्ट्रेटवर मोर्चा : महापोर्टलच्या कारभारावर संताप

अमरावती : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत शासकीय विभागातील नोकरभरतीसाठी परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत घोळ असल्याचा आक्षेप करीत यात सुधारणा करावी अथवा कायमस्वरूपी बंद करून सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी राज्य सेवा आयोगामार्फत नवीन प्राधिकरण तयार करावे, या मागणी करीत स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांनी गुरूवारी गाडगेबाबा समाधी मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मागणीचे निवेदन आरडीसी नितीन व्यवहारे यांना दिले.स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी किंवा एमपीएससी सारखा स्वतंत्र सरळसेवेचा आयोग स्थापन करावा, परीक्षेच्या अवाजवी परीक्षा शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लाचखोरावर कडक कारवाई करावी, परीक्षा केंद्रावर होणाऱ्या गैरकारभार कडक कारवाई करावी, ज्या जिल्ह्यातील विद्यार्थी असेल त्याच ठिकाणी परीक्षा केंद्र द्यावे, ऑनलाईन परीक्षा रद्द करावी व सर्वांना एकच पेपर एकाच दिवशी असावा, परीक्षेचे निकाल त्वरीत जाहीर करावे, पदभरतीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, परीक्षार्थीकडे आधारकार्डची कलर डुप्लीकेट प्रत असल्यास त्याला परीक्षेपासून वंचित न ठेवता त्याच्यापासून लेखी हमीपत्र लिहून परीक्षेला बसण्याची संधी द्यावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी कृती समितीचे किशोर जाधव, निखिल भोवते, हर्षल मुन्दे, सिद्धांत डोंगरे, धनश्याम जाधव, संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी