महापरीक्षा पोर्टल विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:01 IST2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:01:00+5:30
र्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी किंवा एमपीएससी सारखा स्वतंत्र सरळसेवेचा आयोग स्थापन करावा, परीक्षेच्या अवाजवी परीक्षा शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लाचखोरावर कडक कारवाई करावी,.........

महापरीक्षा पोर्टल विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश
अमरावती : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत शासकीय विभागातील नोकरभरतीसाठी परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत घोळ असल्याचा आक्षेप करीत यात सुधारणा करावी अथवा कायमस्वरूपी बंद करून सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी राज्य सेवा आयोगामार्फत नवीन प्राधिकरण तयार करावे, या मागणी करीत स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांनी गुरूवारी गाडगेबाबा समाधी मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मागणीचे निवेदन आरडीसी नितीन व्यवहारे यांना दिले.
स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी किंवा एमपीएससी सारखा स्वतंत्र सरळसेवेचा आयोग स्थापन करावा, परीक्षेच्या अवाजवी परीक्षा शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लाचखोरावर कडक कारवाई करावी, परीक्षा केंद्रावर होणाऱ्या गैरकारभार कडक कारवाई करावी, ज्या जिल्ह्यातील विद्यार्थी असेल त्याच ठिकाणी परीक्षा केंद्र द्यावे, ऑनलाईन परीक्षा रद्द करावी व सर्वांना एकच पेपर एकाच दिवशी असावा, परीक्षेचे निकाल त्वरीत जाहीर करावे, पदभरतीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, परीक्षार्थीकडे आधारकार्डची कलर डुप्लीकेट प्रत असल्यास त्याला परीक्षेपासून वंचित न ठेवता त्याच्यापासून लेखी हमीपत्र लिहून परीक्षेला बसण्याची संधी द्यावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी कृती समितीचे किशोर जाधव, निखिल भोवते, हर्षल मुन्दे, सिद्धांत डोंगरे, धनश्याम जाधव, संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.