अमरावती जिल्ह्यातील आष्टीत शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 14:29 IST2019-01-18T14:29:11+5:302019-01-18T14:29:33+5:30
भातकुली तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयातील भिंत कोसळून एक विद्यार्थी ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.

अमरावती जिल्ह्यातील आष्टीत शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू
ठळक मुद्देदुपारी १ वाजता घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: भातकुली तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयातील भिंत कोसळून एक विद्यार्थी ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव वैभव गावंडे (१३) असे असून तो आठवीत शिकत होता. वर्ग सुरू असताना अचानक ही भिंत कोसळल्याचे सांगितले जाते. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली असून, स्थिती तणावपूर्ण आहे. जखमी विद्यार्थी देवरी व अनकवाडी आणि आष्टी येथील आहेत.