समलिंगी डेन्टीस्टला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:24 IST2018-04-09T05:24:57+5:302018-04-09T05:24:57+5:30

पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या डेन्टीस्टविरोधात पत्नीने पोलीस तक्रार केल्याची घटना शहरात उघडकीस आली.

Stuck in a gay dentist | समलिंगी डेन्टीस्टला अटक

समलिंगी डेन्टीस्टला अटक

अमरावती : पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या डेन्टीस्टविरोधात पत्नीने पोलीस तक्रार केल्याची घटना शहरात उघडकीस आली. ५ एप्रिल रोजी नोंदविलेल्या या तक्रारीचा तपास सायबर सेलकडे सोपविण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला शनिवारी रात्री अटक केली आहे.
तक्रारकर्त्या पत्नी व आरोपी पती हे दोघेही डेन्टीस्ट असून, त्यांचा शहरातील मध्यवस्तीत दवाखाना आहे. १८ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांतच पतीला लैंगिक संबंधाविषयी आकर्षण नसल्याचे पत्नीच्या लक्षात आले. तरीही तिने संसार सुरू ठेवला. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, चार ते पाच वर्षांपासून पतीने संबंध ठेवणे नाकारल्याने संशय बळावून पत्नीने त्याचा मोबाईलमधील तपासला. त्या वेळी त्याचे एका पुरुषासोबत लैंगिक संबंध असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच दिवशी तिने पतीचे घर सोडले.
>स्पाय कॅमेºयाचा वापर
स्पाय कॅमेºयाचा वापर करून तिने पतीच्या अनैसर्गिक कृत्याचा पदार्फाश केला. पतीवर वॉच ठेवण्यासाठी पतीच्या क्लिनीकमध्ये तिने छुपा कॅमेरा लावला होता.

Web Title: Stuck in a gay dentist