एसटीचे ‘सिमोल्लंघन’प्रवासी मात्र घरातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:24+5:302021-07-10T04:10:24+5:30
बस फेऱ्या पूर्ण क्षमतेने ; कोरोना पाठोपाठ ‘डेल्टाचे ’सावट अममरावती ; कोरोनामुळे मागील तीन महिने आदी मध्यप्रदेशातील बस फेऱ्या ...

एसटीचे ‘सिमोल्लंघन’प्रवासी मात्र घरातच !
बस फेऱ्या पूर्ण क्षमतेने ; कोरोना पाठोपाठ ‘डेल्टाचे ’सावट
अममरावती ; कोरोनामुळे मागील तीन महिने आदी मध्यप्रदेशातील बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. यावर अद्याप निर्बध कायम आहेत. याशिवाय तेलंगणात जाणाऱ्या बस सुद्धा तूर्तास बंद आहेत. त्यामुळे एसटीचे सीमोल्लंघन झाले असतानाही प्रवासी मिळत नसल्याने कमी प्रवासी संख्येवर फेऱ्या सोडावे लागत आहे.
जिल्ह्यातून मध्यप्रदेश,तेलंगणा राज्यात एसटी महामंडळाकडून बसलेल्या सोडण्यात येतात. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे शेजारी राज्यांना कोरोनाचा वाढता धोका पाहता. राज्यातून बस फेऱ्यांना प्रतिबंध केला हाेता. दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या घटली.आता काही प्रमाणात राज्यातील निर्बध कमी केले असताना मध्य प्रदेशातील बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. मध्यप्रदेश सरकारने १४ जूनपर्यत या बस सेवांवर प्रतिबंध घातला होता. त्यामुळे यापुढे प्रतिबंध कायम राहतात की नाही याबाबत स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे तुर्तास मध्यप्रदेशातील बैतुल,छिंदवाडा,भोपाळ,बऱ्हाणपूर,मुलताई पांढूर्णा व तेलंगणा राज्यात जाणारी हैद्राबाद आदी ठिकाणच्या बस फेऱ्या पुढील आदेश आल्यानंतरच सोडण्यात येणार आहेत. अशातच सध्या आंतरराज्य बस फेऱ्यांनाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असला तरी ज्या बसफेऱ्या पाहीजे त्या बंद असल्यामुळे प्रवासी मात्र घरातच बसून आहेत.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण आगार -८
एकूण बसेस -३७१
सध्या सुरू असलेल्या बसेस -२४२
रोज एकूण फेऱ्या-९४९
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस -००
बॉक्स
पुन्हा तोटा वाढला
माहे फेब्रुवारी २०२० मध्ये प्राप्त झालेले विभागाचे उत्पत्न ११८८.१६ एवढे होते.माहे जूनमध्ये विभागाचे उत्पन्न ४७६.८० म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी विभागाचे उत्पन्न ७११.३६हजार रूपये आहे.
बॉक्स
दुसऱ्या राज्यातील बससेला प्रवासी मिळेनात
सध्यास्थितीत अमरावती विभागाचे आंतरराज्य प्रवासी वाहतुकल बंद आहेत.त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
बॉक्स
अनेक मार्गावरील बस फेऱ्या बंद
विभागात सध्या लांब व मध्यम पल्ला बस फेऱ्या सुरू असून आंतरराज्य मार्गावरील फेऱ्या बंद आहेत.तसेच शाळा बंद असल्यामुळे सुरू शालेय फेऱ्या बंद आहेत.सद्यास्थितीत जिल्हा ते तालुका व तालुका ते तालुका या मार्गावर वाहतुक सुरू असून ग्रामीण भागातील वाहतुक काही प्रमाणात सुरू आहे.
बॉक्स
परतवाडा,यवतमाळ,वरूड मार्गावर गर्दी
अनलॉक नंतर एसटी बस सेवा पूर्ववत सुरू झाली. परंतु राज्य शासनाने पुन्हा निर्बध लावल्याने प्रवासी संख्या रोडावली आहे.अशातच आजघडीला परतवाडा, वरूड, दर्यापूर, मोशी, चांदूर बाजार,प खेड आणि यवतमाळ या मार्गावर प्रवाशांची गर्दी आहे.