शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

पक्षासाठी झटतो, नेतृत्व मोठे करतो, त्याला भेटायला आलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 5:00 AM

ना. वळसे पाटील यांनी येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशी आघाडीवर येईल, याचा कानमंत्र देताना आपसातील हेवेदावे बाजूला सारण्याचे आवाहनही त्यांनी  केले. महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे पाच वर्षे पूर्ण करेन, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, समस्या सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जो कार्यकर्ता पक्षासाठी झटतो, नेतृत्व मोठे करतो, त्याला भेटले पाहिजे. म्हणूनच कोरोना संसर्ग कमी होताच तुमच्या भेटीसाठी आलो आहे. तुमचे प्रश्न, समस्या जाणून घेणार. त्या साेडविल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.शेगाव नाका स्थित अभियंता भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, माजी आमदार केवलराम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, शहराध्यक्ष सुचिता वनवे, रवींद्र गायगाेले, वाहेद खान, अरुण गावंडे, गणेश राय, हेमंत देशमुख, माजी महापौर किशोर शेळके, गणेश राय आदी उपस्थित होते.ना. वळसे पाटील यांनी येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशी आघाडीवर येईल, याचा कानमंत्र देताना आपसातील हेवेदावे बाजूला सारण्याचे आवाहनही त्यांनी  केले. महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे पाच वर्षे पूर्ण करेन, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, समस्या सोडविले जातील, असा विश्वास त्यांनी दिला. हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, वसंत घुईखेडकर, सुनील वऱ्हाडे यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी सुरेखा ठाकरे, सुनील वऱ्हाडे, रवींद्र गायगोले, अजय मेहकरे, वसंत घुईखेडकर, चित्रा डहाणे या नवनियुक्त जिल्हा बॅंक संचालकांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी केले. संचालन अविनाश मार्डीकर व आभार प्रदर्शन राजेंद्र महल्ले यांनी केले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संजय खो़डके यांच्या निवासस्थानी स्नेहभोज, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला प्रभारी सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. 

कार्यालय निर्मितीसाठी पुढाकारअमरावती येथे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निर्मितीसाठी यशस्वी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. पोलिसांनी कोरोना काळात चांगली कामगिरी बजावल्यामुळे येत्या काळात त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी भरीव कार्य करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

राष्ट्रवादीच्या अडचणींचा सारथीगृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीतील सारथी असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी काढले. ज्या पदावर त्यांनी काम केले, त्याला न्याय देण्याची भूमिका बजावली. आता गृहमंत्रालय त्यांच्या कामगिरीने झळाळून निघेल, असा आशावाद खोडके यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस